esakal | हिंगोली : शेवाळा गावात बिबट्या दिसला, ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

कळमनुरी तालुक्यातील कांडली शिवारात मागच्या दोन दिवसापूर्वी बिबट्या दिसला असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले होते

हिंगोली : शेवाळा गावात बिबट्या दिसला, ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण

sakal_logo
By
रंगनाथ नरवाडे

शेवाळा (जिल्हा हिंगोली) : कळमनुरी तालुक्यातील कांडली शिवारानंतर बुधवार (ता.३०) सायंकाळी शेवाळा गावात बिबट्या दिसल्याचे गावकरी सांगत असुन वनविभागाचे पथक गावात दाखल झाले आहे. ठसे पाहुन कोणता प्राणी असल्याचे निदान केले जाणार आहे.

कळमनुरी तालुक्यातील कांडली शिवारात मागच्या दोन दिवसापूर्वी बिबट्या दिसला असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले होते. त्यानंतर वनविभागाचे पथक गावात तळ ठोकून होते. त्यानंतर कांडली गावापासून काही अंतरावर असलेल्या शेवाळा गावात बुधवारी रात्री साडे अकरा वाजता  शेख कल्लु बेलदार त्यांच्या घरासमोर बिबट्याला ग्रामपंचायतकडे  जातांना दिसल्याचे सांगितले. त्यामुळे ते घाबरून गेले पुढे गावाच्या बाहेर ग्रामपंचायत रस्त्यावर शेतकरी सुनील सुर्यवंशी व गोंविद सावंत हे दुचाकीवरुन शेतातून घराकडे येतांना बिबट्या दिसल्याने ते बिबट्याला घाबरून दुचाकीवरून पडले शिवाय गावात बिबट्या शिरल्याचे सांगुन गावकऱ्यांना जागी केले.

हेही वाचा - Success Story: टोकन पद्धतीने तूर लागवड; भरघोस उत्पन्नाची हमी! माहूर तालुक्यातील गोंडवडसा येथे यशस्वी प्रयोग

यावेळी गावकऱ्यांनी एकत्र येऊन एकमेकांना दिलासा दिला शिवाय माजी उपसभापती गोपु पाटील यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना मोबाईलवर संपर्क साधला असता मोबाईल बंद होता.  दरम्यान गोपु पाटील यांनी गुरुवारी (ता. ३१) सकाळी गावकऱ्यांसोबत त्यांच्या निवासस्थानी बैठक घेऊन शेतकरी व शेतमजूरांना शेतात जातांना सावधगिरी बाळगण्याचे मार्गदर्शन केले. तसेच शेतात वन्यजीव प्राणी कोणाला आढळून आल्यास संपर्क करुन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यास कळवावे असे सांगितले.

त्यानंतर सकाळी दहा वाजता वन विभागाचे वनपरिवहनमंडळ वारंगा येथील वन विभागाच्या प्रिया साळवे व कर्मचारी यांनी बिबट्या शिरला त्या ठिकाणी जाऊन  बिबट्याच्या पाऊलखुणाची पाहणी केली. मात्र त्या दिसल्या नसल्याने आणखी शोध सुरू ठेवला आहे. शिवाय शेवाळा गावात ग्रामस्थांना शेतकऱ्यांना मजुरांना शेतात कामाला गेल्यावर सावधानता बाळगण्याच्या. सुचना देऊन वन्यजीव प्राण्यांपासुन सुरक्षित राहण्यासाठी सावधगिरी बाळगावी असे आवाहन केले शिवाय सुरक्षिततासाठी गावात प्रसिद्धीपत्रक  वाटप केले. यावेळी  माजी उपसभापती गोपु पाटील, माजी  सरपंच अभय सावंत, सुजय सुर्यवंशी, मझहर पठाण, राम पुजारी, अमर सावंत, सूनिल सावंत, विजय सुर्यवंशी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image
go to top