हिंगोली : यंदा सर्वसामान्यांना आंबे ‘आंबट’

भाववाढ : केशर १८० तर दशहरी आंबा १२० रुपये किलो
Hingoli Mango market price increase this season
Hingoli Mango market price increase this season sakal

हिंगोली : बाजारपेठेत फळांचा राजा आंबा विक्रीस आला आहे. त्यामध्ये केशर आंबा, दशहरी आंबा, बदाम आंबा हे आंबे विक्रीला आले. सध्या या आंब्याचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे त्यांची खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे झाले आहे. सध्या बाजारपेठेमध्ये केशर आंबा १८०, दशहरी आंबा १२० ते दीडशे रुपये किलो तर बदाम आंबा १०० रुपये किलो या दराने विक्री होत आहे.

एकीकडे महागाई सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले. दुसरीकडे आंब्याचे भावही गगनाला भिडले आहेत. वृक्षतोडीमध्ये फळांचा राजा आंबाही मोठ्या प्रमाणात तोडल्यामुळे गावरान आंबा हा बाजारपेठेमध्ये सध्यातरी उपलब्ध झालेल्या नाही. गावरान आंबा ही दुर्मिळ झाल्याचे चित्र आहे. बाजारात उपलब्ध झालेल्या आंब्यात दर मात्र गगनाला भिडले आहेत. यंदा आंब्याची मोठी आवक होईल आणि सुरुवातीपासून आंबा आवाक्यात राहील, अशी शक्यता डिसेंबरमध्ये वर्तविण्यात आली होती. मात्र, बदलत्या वातावरणाचा फटका आंब्याला बसल्याने मोहर गळाला. त्यामुळे उत्पादन घटले. मात्र, आता आंब्याचे दर वाढले आहेत. दरम्यान, रत्नागिरी हापूस आंब्याचे दर तर १३०० ते १८०० डझन झाले आहेत. त्यामुळे हापूस आंबा केवळ श्रीमंत व्यक्तीच खरेदी करीत असल्याचे चित्र आहे. वाढत्या शहरीकरणामुळे गावरान आंबा दर दुर्मिळ झाला आहे. पूर्वी गावोगावी दिसणाऱ्या आंबराईही कमी झाल्या आहेत.

खात्री करूनच खरेदी करा

झाडाला आंबा लागल्यापासून ते तो पिकेपर्यंत १३० ते १४० दिवस लागतात; पण काही व्यापारी कमी भावात कैऱ्या घेऊन एका दिवसात पिकवतात. त्यासाठी चुनखडीसारख्या दिसणाऱ्या कॅल्शिअम कार्बाईटची पूड कैरीच्या क्रेटमध्ये ठेवतात. अवघ्या २४ तासांतच रासायनिक प्रक्रिया होऊन कैरीचे रूपांतर पिवळ्याधमक आंब्यात होते. त्यामुळे खात्री करूनच आंब्याची खरेदी करावी. कृत्रिमरीत्या पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईटचा वापर केला जातो. असा आंबा हातात घेऊन दाबल्यास नरम लागतो. तो दिसायला पिवळाधमक, साल गुळगुळीत असते. नैसर्गिकरीत्या पिकलेल्या आंब्याला एक विशिष्ट सुगंध असतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com