बनावट नोटा देण्यास आलेल्या तिघांना पकडले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

हिंगोली - दहा लाख रुपये खऱ्या नोटांच्या मोबदल्यात तीस लाख रुपयांच्या बनावट नोटा देतो असे म्हणून औंढा नागनाथ येथे दाखल झालेल्या तिघांना पोलिसांनी छापा टाकून पकडले. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली.

हिंगोली - दहा लाख रुपये खऱ्या नोटांच्या मोबदल्यात तीस लाख रुपयांच्या बनावट नोटा देतो असे म्हणून औंढा नागनाथ येथे दाखल झालेल्या तिघांना पोलिसांनी छापा टाकून पकडले. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली.

गजानन निर्मले यांनी पोलिसांकडे अर्ज दिला. त्यानुसार नांदेड येथील नसरुल्ला पठाण याने निर्मले यांना दहा लाख रुपये खऱ्या नोटांच्या मोबदल्यात तीस लाख रुपयांच्या बनावट नोटा देतो, असे सांगून औंढा नागनाथ येथे येण्यास सांगितले. तेव्हा पोलिसांनी सापळा रचला. तेव्हा नसरुल्ला पठाण याने फिर्यादी निर्मले यास वेळो-वेळी फोन करून पैशाच्या बॅगसह तिघांना कारमध्ये पाठवले आहे, असा निरोप दिला. त्यावरून पोलिसांनी छापा मारला असता तिघे संशयित आढळले.

पोलिसांनी चौकशी केली असता त्यामध्ये श्रीनिवास भोमपल्ली (रा. आरमूर, जि. निजामाबाद, तेलंगण) व अन्वरखान गफूरखान (रा. हिमायतनगर, जि. नांदेड) यांच्यासह कारचालक सैफखान जानखान (रा. इस्लामपूर, जि. नांदेड) यांना पकडले. तसेच त्यांची तपासणी केली असता पाचशे रुपये दराच्या तीन चलनी नोटा, तसेच शंभर रुपये दराच्या बाजारू नोटा, एक लाकडी बॉक्‍स व कार ताब्यात घेण्यात आली. याप्रमाणे पाच लाख सहा हजार पाचशे रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. बनावट नोटांच्या माध्यमातून फसवणूक करणारी ही आंतरराज्य टोळी असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.

Web Title: hingoli marathwada news three arrested by bogus currency