हिंगोलीचे आमदार मुटकुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी बिनविरोध

file photo
file photo

हिंगोली : परभणी- हिंगोली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी आमदार तान्हाजी मुटकुळे यांची बिनविरोध निवड झाली. हिंगोलीत फटाके फोडून भाजप कार्यालयाजवळ बुधवारी (ता. १०) जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांची यावेळी मिरवणुक काढण्यात आली. 

प्रारंभी आमदार तान्हाजी मुटकुळे यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सोसायटी गटातून संचालक पदी बिनविरोध निवड होताच त्यांचा परभणी येथे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी त्यांचा सत्कार केला. त्यानंतर आमदार तान्हाजी मुटकुळे यांचे हिंगोली येथे आगमन होताच नाईकनगर कॉर्नरजवळ येताच त्यांचे फटाके फोडून जंगी स्वागत करण्यात आले.

यांची होती उपस्थिती

यावेळी माजी आमदार रामराव वडकुते, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हा सरचिटणीस फुलाजी शिंदे, संतोष टेकाळे, बाबा घुगे, शहर अध्यक्ष प्रशांत सोनी, रजनी पाटील, उमेश नागरे, अॅड. अमोल जाधव, उत्तमराव जगताप ,सुनील जामकर, हमीद प्यारेवाले , प्रकाश थोरात, उमेश गुट्ठे, नारायण खेडेकर आणि मोतीराम इंगोले आदींची उपस्थिती होती.

हिंगोली सहकारी संस्था मतदार संघातील निवडणुका बिनविरोध

दरम्यान, हिंगोली सहकारी संस्था मतदारसंघातून दत्तराव जाधव यांनी मंगळवारीच उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. त्यापाठोपाठ बुधवारी गुलाबराव सरकटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आमदार मुटकुळे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, ज्येष्ठ नेते तथा माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर व ज्येष्ठ नेते माजीमंत्री आमदार सुरेश वरपुडकर यांच्याबरोबरील संयुक्त बैठकीनंतर वसमत सहकाही संस्था मतदारसंघातून आमदार राजु नवघरे यांचा उमेदवारी अर्ज कायम राखण्याचा निर्णय झाला. त्यापाठोपाठ अंबादासराव भोसले यांनी येथून बुधवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. अन्य उमेदवारांनीही रिंगणातून माघार घ्यावी, या दृष्टीने प्रयत्न केल्या गेले. परंतु श्रीमती नादरे यांनी आपला अर्ज कायम राहिल्याने आमदार राजू नवघरे यांची बिनविरोध निवड झाली नाही. दरम्यान, हिंगोली सहकारी संस्था मतदार संघातील निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com