हिंगोलीत पालिकेची गांधीगिरी; विनामास्क फिरणाऱ्यांचा गुलाब,मास्क देऊन सत्कार

जिल्ह्यात आतापर्यंत १६ हजार १४५ रुग्ण कोरोनाबाधित झाले आहेत.
Hingoli News
Hingoli Newsesakal

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्हा प्रशासनाने कोरोनाचे नियम पाळत मास्क वापरण्याचे आवाहन सर्वांना केले आहे. मात्र हिंगोली (Hingoli) शहरात विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या बरीच आहे. नगरपरिषदेने बुधवार (ता.१२) गांधीगिरी करत विनामास्क फिरणाऱ्यांचा गुलाबपुष्प व मास्क देऊन सत्कार केला आहे. दरम्यान जिल्ह्यात कोरोनाची संख्या दररोज वाढत आहे. सद्य:स्थितीत ६३ जण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १६ हजार १४५ रुग्ण बाधित झाले आहेत. १५ हजार ६८६ रुग्ण उपचारातुन बरे झाले आहेत. डिसेंबर महिन्यात शुन्यावर आलेली रुग्णसंख्या मंगळवारीपर्यंत (ता.११) ६३ झाली आहे.(Hingoli Municipal Council Take Action Who Not Wear Masks)

Hingoli News
आमदार गुट्टे कोरोना पॉझिटिव्ह,अनेक जण संपर्कात आल्याने चिंता वाढली

यामुळे कोरोना (Corona) झपाट्याने वाढत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने निर्बंध लावले आहेत. त्याची अंमलबजावणी केली जात आहे. मात्र अनेक नागरिक याकडे दुर्लक्ष करत आहेत. दरम्यान नगरपरिषदेने बुधवारी सकाळी ११ वाजता शहरातील इंदिरा चौक येथे, नगरपालिकेचे मुख्य अधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेच्या वतीने गांधीगिरी करत तोंडाला मास्क न लावणाऱ्या नागरिकांचे गुलाबाचे पुष्प व मास्क देऊन स्वागत करण्यात आले. तसेच शहरात नागरिकांना मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरपालिकेचे डी.पी.शिंदे, श्री.राठोड, पंडित मस्के, उत्तम जाधव, रवी दरक यांच्यासह पोलीस प्रशासनातील पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने नागरिकांनी आपल्या चेहऱ्यावर मास्कचा वापर करावा आणि कोरोनापासुन आपले संरक्षण करावे असे आवाहन करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com