हिंगोलीत राष्ट्रवादीचे मुक आंदोलन

मंगेश शेवाळकर
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

हिंगोली : राज्यात भुजल अधिनियम लागू करून शेतकऱ्यांना संपवायचे आहे काय? यासह इतर प्रश्नांचे फलक लाऊन केंद्र व राज्याच्या धोरणाच्या निषेधार्थ हिंगोलीत राष्ट्रवादीने मंगळवारी (ता.२) महात्मा गांधी चौकात मुक आंदोलन केले. 

हिंगोली : राज्यात भुजल अधिनियम लागू करून शेतकऱ्यांना संपवायचे आहे काय? यासह इतर प्रश्नांचे फलक लाऊन केंद्र व राज्याच्या धोरणाच्या निषेधार्थ हिंगोलीत राष्ट्रवादीने मंगळवारी (ता.२) महात्मा गांधी चौकात मुक आंदोलन केले. 

येथील महात्मा गांधी चौकात आयोजित या आंदोलनामधे माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आमदार रामराव वडकुते, जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अनिल पतंगे, जिल्हा परिषद सदस्य मनिष आखरे, डॉ. स्वप्नील गुंडेवार, सुमीत्रा टाले, माजी नगराध्यक्षा अनिता सुर्यतळ, जावेदराज, युवक जिल्हाध्क्ष बालाजी घुगे, माधव कोरडे, संजय दराडे, नरसिंग देशमुख, संचित गुंडेवार, संतोष गुठ्ठे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

भुजल अधिनियम लागू करून शेतकऱ्यांना संपवायचे काय? सनातनवर बंदी कधी घालणार?संविधानाचा अपमान करणार्ऱ्यांवर कारवाई का नाही केली? यासह इतर प्रश्नांचे फलक लावण्यात आले होते. सकाळी दहा वाजता सुरु झालेल्या या मुक आंदोलनात राष्ट्रवादीचे पदाधिकारी तोंडावर काळ्यापट्ट्या लाऊन सहभागी झाले होते. सर्वसामान्यांच्या प्रश्नावर वेळोवेळी आंदोलन केल्यानंतरच केंद्र व राज्य शासनाकडून कुठलेही प्रश्न सोडण्यात आले नाही. यामुळे सरकारच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आल्याचे उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी सांगितले.

काँग्रेस आमदारांची भेट
या आंदोलनास कळमनुरीचे काँग्रेसचे आमदार डॉ. संतोष टारफे यांनी भेट देऊन पाठींबा दिला. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी बापुराव बांगर, माजी नगराध्यक्ष सुधीर सराफ, विलास गोरे, भागोराव राठोड यांचेही उपस्थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli Nationalist Salient Movement