अजित पवार यांनी टपरीवर घेतला कॉफीचा स्वाद...!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

हिंगोली - राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेच्या सातव्या दिवशी सोमवारी (ता. २२ ) हिंगोली येथील सभेसाठी मार्गक्रमण करीत असताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कॉफीची तलफ आली आणि त्यांनी गाडी थांबवायला सांगितले. रस्त्यावर कुठेच चांगले हॉटेल नसल्याने चालक गाडी थांबविण्यासाठी थोडा साशंक होता. त्याची ही घालमेल अजितदादांनी ताडली आणि कळमनुरी तालुक्‍यातील माळेगाव फाटा येथे एका टपरीवर गाडी थांबविण्याचा इशारा केला. याच टपरीवर त्यांनी कॉफी पिणे पसंद केले. तेथे उपस्थित लोकांमध्ये बसून त्यांनी कॉफीचा स्वाद घेतल्याचे पाहून सर्वच आश्‍चर्यचकित झाले.

कॉफी बनवेपर्यंत अजितदादांनी चहावाल्याशी संवाद साधायला सुरवात केली. टपरीवर आणखी काय स्पेशल मिळते असे विचारल्यावर इथे भजी आणि खिचडी ‘फेमस’ असल्याचे चहावाल्याने सांगितले. तेव्हा गरम-गरम भज्यांचाही अजितदादांसह सहकाऱ्यांनी आस्वाद घेतला.

Web Title: hingoli news ajit pawar coffee