नागपंचमीनिमित्त औंढ्यात दर्शनासाठी भाविकांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

गुरुवारी नागपंचमीनिम्मीत्त नागनाथाचे दर्शन घेतल्याने भाविकांना पुण्य प्राप्ती होते अशी भाविकांची श्रध्दा असल्याने याठिकाणी दर्शनासाठी पंचक्रोषीतील भावीकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती.

औंढा नागनाथ : देशातील आठवे ज्योतीर्लींग श्री नागनाथ मंदिरामध्ये नागपंचमीनिमित्त दर्शन घेण्यासाठी आज (गुरुवार) दिवसभर भाविकांची गर्दी दिसून आली.

गुरुवारी नागपंचमीनिम्मीत्त नागनाथाचे दर्शन घेतल्याने भाविकांना पुण्य प्राप्ती होते अशी भाविकांची श्रध्दा असल्याने याठिकाणी दर्शनासाठी पंचक्रोषीतील भावीकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. भगवान शंकराच्या गळयातील ताईत व विशेष महत्त्व प्राप्त असलेल्या नागपंचमीला महादेवाची पुजा करण्याची परंपरा प्राचीन काळापासुन आहे.

या दिवशी नागवंशीय व तांत्रिक मांत्रिक लोक पुजा करण्यासाठी येतात. मंदिरात अशा पुजेला बंदी असल्याने हे लोक जंगलात दुर जाऊन पुजा करीत असल्याचेही आढळते. तसेच नागनाथ मंदिर परीसरात आरगडी नागाचे भजन व बारीचे भजनही हे लोक मोठया उत्साहाने गातात. तसेच आज नागपंचमीच्या निमित्त भाविक भक्त मोठया प्रमाणात दिंड्यासह मोठया उत्साहाने नागनाथाच्या दर्शनासाठी येतात. तसेच नागनाथ मंदिरामध्ये चिखलाचे वारुळ तयार करण्यात येते व त्याची पूजा महिला दुध व लाहया देवुन करतात. तसेच रात्रीला 2.00 वाजता भाविकांच्या दर्शनासाठी नागनाथ देवस्थानने मंदिर खुले केले होते. देवस्थानचे सुरक्षा गार्ड व पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच देवस्थानचे अध्यक्ष निळकंठ देव व सन्माननिय विश्वस्त व सल्लागार हे दिवसभर मंदिरात तळ ठोकून होते.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: Hingoli news Aundha Nagnath temple