हिंगोलीत शिवसेनेचे मुंडन आंदोलन

मंगेश शेवाळकर
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करा

कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करा

हिंगोलीः जिल्हयात कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिध्द करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेतर्फे आज (मंगळवार) जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत. मात्र, त्याकडे शासनाचे लक्ष नाही. तसेच शासनाने दिलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप शिवसेनेतर्फे करण्यात आला आहे. जिल्हयात कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिध्द करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेने यापुर्वी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेसमोर ढोलबजाओ आंदोलन केले होते. त्यानंतरही याद्या प्रसिध्द करण्यात आल्या नाहीत.

दरम्यान, शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष बांगर, बाजार समितीचे सचिव रामेश्‍वर शिंदे पाटील केसापूरकर, नगरसेवक दिनेश चौधरी, युवासेनेचे जिल्हा प्रमुख दिलीप घुगे, सुभाष बांगर, दिलीप बांगर, राम कदम, कडुजी भवर, कळमनुरी पंचायत समितीचे सदस्य अजय सावंत, दिनकर गंगावणे यांच्यासह शिवसेना कार्येकर्त्यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयावर मोर्चा काढला. त्या ठिकाणी मुंडन आंदोलन केले. त्यानंतर जिल्हा उपनिबंधक एस. पी. मैत्रेवार यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सादर केले.

दरम्यान, आठ दिवसांच्या आत कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिध्द न झाल्यास आणखी तिव्र आंदोलन केले जाणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख श्री. बांगर यांनी दिली. जोपर्यंत याद्या प्रसिध्द होणार नाहीत तो पर्यंत टप्प्या टप्प्याने आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचेही श्री. बांगर यांनी स्पष्ट केले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
मराठ्यांनो, जातीय अस्मितेच्या विळख्यातून बाहेर पडा...
‘आई, तिला विचार तू का आलीस?’
तुरुंगातील 'व्हीआयपी' बडदास्त सीसीटीव्हीतून उघड
डोकलामप्रश्‍नी लवकरच तोडगा निघेल : गृहमंत्री
भाजप सुसाट; "राष्ट्रवादी' सपाट 
डेंगीचा आजपासून नायनाट
राज ठाकरे आज पुण्यात 
भाजपच्या भूमिकेमुळेच मंत्रिमंडळ विस्तार लांबला
तातडीचे कर्ज फक्त २४ हजार शेतकऱ्यांना
स्वाइन फ्लूचे अत्यवस्थचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात 

Web Title: hingoli news famer list shivsena mundan movement