हिंगोली : जिल्हाभरातील अंगणवाड्यात पोषण अभियानास प्रारंभ 

राजेश दारव्हेकर
Sunday, 13 September 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स पाळत प्रतिबंधात्मक उपाय योजना करीत उपक्रम राबविले जाणार असल्याचे  महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांनी सांगितले.

हिंगोली : जिल्हाभरातील एक हजार ८९ अंगणवाड्यामध्ये आठ ते ३० सप्टेंबर या दरम्यान पोषण अभियानास  सुरुवात झाली असून  अंगणवाड्यात आढावा बैठक घेऊन, गृहभेटीच्या माध्यमातून भेटी देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स पाळत प्रतिबंधात्मक उपाय योजना करीत उपक्रम राबविले जाणार असल्याचे  महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग,  यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात आठ ते ३० सप्टेम्बर या कालावधीत पोषण अभियान आयोजन दर वर्षी प्रमाणे यंदाही  सीईओ राधाबीनोद शर्मा  ,महिला बालकल्याण सभापती रूपाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.या अभियानात संपूर्ण महिना भर विविध उपक्रम राबविले जात आहेत.

हेही वाचा धक्कादायक : तुरीच्या शेतात गांजा, एटीसी आणि कुरुंदा पोलिसांची कारवाई

स्तनदा माता, गरोदर माता याना सकस आहार देण्याच्या सूचना

मंगळवारी (ता.८) पोषण अभियानाचे मान्यवर मंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन औपचारिक उदघाटन झाले.तर बुधवारी ( ता.९) अंगणवाड्यात परसबाग निर्माण केली आहे. याबाबत कार्यशाळा घेण्यात आली, यावेळी पर्यवेक्षिका कडून अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना स्तनदा माता, गरोदर माता याना सकस आहार देण्याच्या सूचना दिल्या. तर गुरुवारी ( ता.१०) रोजी  शुन्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचे अंगणवाडी केंद्रात लसीकरण  वजन, उंची, दंडघेर घेत गृहभेटी द्वारे पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. शुक्रवारी (ता.११) गरोदर माता, स्तनदा माता यांच्या घरी भेटी दिल्या तर शनिवारी (ता.१२) कुपोषित बालकांच्या नोंदी घेत त्यांना पुन्हा सुदृढ बालकांसाठी कसे काय करावे याबाबत गृहभेटीच्या माध्यमातून पालकांना समुपदेशन करण्यात आले, तसेच शिक्षण विभागाच्या वतीने बालकांसाठी पोस्टर्स स्पर्धा घेण्यात आल्या. 

बालकांच्या माध्यमातून प्रत्येक अंगणवाडी केंद्रांतर्गत गावात पोषण आहार जनजागृती केली जात आहे.

कोरोना प्रादुर्भाव पाहता पोषण अभियान शासनाच्या नियमांचे पालन करीत मास्कचा वापर करीत हे अभियान उपमुख्य कार्यकारी गणेश वाघ , बालविकास प्रकल्प अधिकारी राजकुमार धापसे, नैना पाटील , श्रीमती सोरेन  यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य सेविका विविध उपक्रम राबविले जात आहेत. (ता.३०)  सप्टेंबरला या पोषण अभियानाचा समारोप होत असून त्यापूर्वी अधिकारी, यांनी अंगणवाडी भागात साकारलेल्या परसबागेना भेटी देऊन त्यांची माहिती देणे ,बालकांना सकस आहार देणे ,व्हीसीडीसी केंद्रातील कुपोषित बालकांवर लक्ष ठेवणे ,यावर कार्यशाळा आयोजित करणे, लहान व मोठ्या बालकांच्या गटात पालकांना समुपदेशन करणे असे विविध उपक्रमातून पोषण अभियान राबविण्यात येणार असल्याचे  गणेश वाघ यांनी सांगितले.

संपादन- प्र्लहाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Nutrition campaign started in Anganwadas across the district hingoli news