हिंगोली : जिल्ह्यात एक हजार 70 आशा वर्कर्सना मिळाला मानधनासह वाढीव मोबदला

राजेश दारव्हेकर
Sunday, 13 December 2020

हिंगोली जिल्ह्यात एकूण एक हजार ७० आशा वर्कर कार्यरत आहेत. यामध्ये शहरी ठिकाणी ६७ तर ग्रामीण भागात एक हजार आठ आशा वर्करची संख्या आहे. कोरोना काळात ज्या काही आरोग्य विभागाच्या सूचना तसेच केंद्र शासनाच्या सूचना, शासकीय योजना ग्रामस्तरावर राबविण्यात येतात,

हिंगोली : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार रात्रंदिवस एक करीत आरोग्य विभागासाठी  शासनाचे उपक्रम राबविण्यासाठी  राबणाऱ्या जिल्ह्यातील एक हजार सतर आशा वर्कर यांना मिळणाऱ्या  मानधनसह  वाढीव मोबदला  देण्यात आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. राहुल गीते यांनी दिली.

हिंगोली जिल्ह्यात एकूण एक हजार ७० आशा वर्कर कार्यरत आहेत. यामध्ये शहरी ठिकाणी ६७ तर ग्रामीण भागात एक हजार आठ आशा वर्करची संख्या आहे. कोरोना काळात ज्या काही आरोग्य विभागाच्या सूचना तसेच केंद्र शासनाच्या सूचना, शासकीय योजना ग्रामस्तरावर राबविण्यात येतात, या आशा वर्करांनी अहोरात्र परिश्रम घेतले आहेत. एवढेच नव्हे तर या आशा वर्करांमुळे अनेक गर्भवती व प्रसूती मातांना योग्य ती मदत देखील झालेली आहे.

हेही वाचा - हिंगोली : बिजभांडवल योजनेसाठी अर्ज दाखल करण्याचे आवाहन

अजूनही कोरोना मधून आपण सावरलेलो नाही. मात्र अशा ही विदारक परिस्थितीत ग्रामीण व शहरी भागातील आशा वर्करांनी खूप मोलाचे काम केले आहे. शासनाचे जे ६२ कार्यक्रम असतात ते राबविण्यासाठी ह्या आशा वर्कर धडपडत आहेत. यांची धडपड पाहून दर वर्षी आरोग्य विभागाच्या वतीने आशा वर्करांचा कामाचा तपशील पाहून त्यांना पुरस्काराने देखील सन्मानित केले जाते. त्यामुळे तेवढ्याच गतीने ह्या आशा वर्कर काम करीत आल्याचे गीते यांनी सांगितले.

जिल्ह्यातील आशा वर्करांचे काम हे उत्कृष्ट असल्याने, गेल्या पाच वर्षांपासून हिंगोली जिल्हा हा राज्यात पाचव्या क्रमांकावर आहे. यामध्ये अजिबात खंड पडू दिला नाही. हेच बघून आशा वर्करांचा दर वर्षी सत्कार देखील केला जात आहे.आशा वर्करला महिन्याकाठी दोन हजार एवढे फिक्स मानधन राहते. मात्र पाच ते सहा हजार पर्यत त्यांना त्यांच्या कामावर वाढीव रक्कम ही मिळू शकते. त्यामुळे जिल्ह्यातील आशा वर्करांनी शासकीय योजना प्रत्येक गावातील लोकापर्यंत पोहोचवावेत, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने केले आहे. :

जिल्ह्यत आशा वर्कर यांची तालुका निहाय संख्या   

ओंढा - १८१, वसमत - २२८, हिंगोली १६६, कळमनुरी - २२८, सेनगाव - २०५ असे एकूण १ हजार ८ तर शहरी ठिकाणी ६२ असे एकूण १ हजार ७० एवढी आहे.

- डॉ. राहुल गीते, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी 

 

संपादन-  प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: One thousand 70 Asha workers in the district received increased remuneration along with honorarium hingoli news