हिंगोलीची मैदाने गजबजली युवकांच्या गर्दीने

हिंगोलीची मैदाने गजबजली युवकांच्या गर्दीने


हिंगोलीः ‘आला हिवाळा, आराेग्य सांभाळा’ असे म्हणत अनेक युवकांसह, महिला व आबालवृध्दांनी व्यायाम करण्याला प्राधान्य दिले आहे. यामुळे शहरातील विविध मैदाने युवकांच्या गर्दीने गजबजली आहेत. यातच सैन्य भरतीसाठी अनेकांनी तयारी चालविली आहे. यामुळे जिल्हा युवकांच्या व्यायामातून सुदृध बनत असल्याचे दिसून येते.

 
      शहरातील विविध मैदानावर युवकांसह वयोवृध्दांची व्यायाम करण्यासाठी गर्दी होत असून भरती प्रक्रीयेत सहभागी होण्यासाठी युवकांनी व्यायाम सुरू केला आहे तर वृध्दातून चालण्यावर भर दिला जात आहे. काही युवक विविध खेळ खेळण्याला प्राधान्य देत आहेत. यामुळे सकाळ सायंकाळ खेळाच्या मैदानावर गर्दी होत आहे.


शहरात दसरा ते दिवाळी या काळात परतीचा पाऊस अधूनमधून सुरू असलेल्याने नियमित व्यायामाला बाहेर जाणाऱ्यांना अडचणी येत होत्या. आता मात्र पावसाने विश्रांती घेतल्याने व्यायामाला अनेकांनी सुरवात केली आहे. युवकांनी विविध भरती प्रक्रियेत मैदानी खेळांना महत्‍व असल्‍याने त्‍याची तयारी करण्यासाठी मैदानी खेळ खेळण्याला सुरवात केली आहे. यामुळे शहरातील पोलिस कवायत मैदान, खटकाळी परिसर, आदर्श कॉलेज मैदान, जिल्‍हा परिषद शाळेचे मैदान, रेल्‍वे स्‍थानक परिसर यासह विविध शाळेच्या खुल्‍या मैदानाचा वापर व्यायामासाठी केला जात आहे.


दरम्‍यान, आदर्श महाविद्यालयाच्या प्रांगणावर डबलबार, सिंगलबार उपलब्ध असल्‍याने अनेक जण या मैदानाचा व्यायामासाठी उपयोग करीत आहेत. सकाळ व सायंकाळच्या वेळी अनेक या ठिकाणी गर्दी होत आहे. सकाळच्या व्यायामासाठी आबालवृध्दाचा देखील समावेश आहे. ते मात्र चालण्यावर भर देत आहेत. या मैदानावर येणारे युवक, धावणे, डबलबार, सिंगलबार, लाबंउडी, उंचउडी, दोरीवरील उड्या, गोळाफेक या प्रकाराला अधिक प्राधान्य देत आहेत. पोलिस भरती, सैन्य भरतीत सहभागी होणारे युवक या स्‍पर्धेसाठी कोणत्या प्रकारांना महत्‍व आहे त्‍या प्रकारचा व्यायाम करीत आहेत.

याेग वर्गाला अनेकांची पसंती

व्यायामासाठी लागणारे ट्रॅकसुट, शुज याचा वापर केला जात आहे. यामुळे भल्या पहाटेच अनेक जण यासाठी ग्रुपने जात आहेत तर काही जण एकटे देखील यात सहभागी होत आहेत. तर शहरातील विविध नगरात योगाचे वर्ग सुरू झाले असून यात मोठ्या प्रमाणावर महिला व पुरुष सहभागी होत आहेत.


नियमीत व्यायाम करीत असल्याने कुठल्याही भरतीसाठी व्यायाम करीत नाही. शरीर सुदृढ राहण्यासाठी व्यायाम करतो. धावणे, चालणे या प्रकाराला महत्‍व देतो. यामुळे दिवसभर ताजेतवाने वाटते. -बालाजी बोरकर, युवक.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com