esakal | कोरोनातही हिंगोली पोलिस अलर्ट: एका चोरट्याकडून ३३ मोबाईलसह चार लाखाचा मुददेमाल जप्त

बोलून बातमी शोधा

हिंगोली पोलिस
कोरोनातही हिंगोली पोलिस अलर्ट: एका चोरट्याकडून ३३ मोबाईलसह चार लाखाचा मुददेमाल जप्त
sakal_logo
By
राजेश दार्वेकर

हिंगोली : ट्रकचालकाचे मोबाईल चोरी करणारा आरोपी गजाआड करुन त्याच्याकडून ३३ मोबाईलसह तीन लाख ८९ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने मंगळवार (ता. २७) देण्यात आली आहे. कोरोनाच्या लाॅकडाऊनचा बंदोबस्त करत गुन्हे उघडकीस आणण्यात हिंगोली पोलिसांना यश आले आहे.

जिल्ह्यात होणाऱ्या चोरीच्या घटनांना प्रतीबंध करुन चोरीचे गुन्हे उघड करणेबाबत पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांना योग्य सुचना देवून उपनिरीक्षक के. डी. पोटे यांचे अधीपत्याखाली एक विशेष पथक तयार करुन गुन्हे उघड करण्याचे आदेश दिले होते.

हेही वाचा - काळजी घ्या पण काळजी करु नका असा रुग्ण, नातेवाईकांना जिव्हाळ्याचा सल्ला देतानाच येत्या दहा दिवसांत अख्या महाराष्ट्रातून कोरोना विषाणू हद्दपार होणार

आरोपी सुनील खिल्लारे याला अटक

त्यानुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वसमत परिसरात माहीती काढत असतांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला सराईत गुन्हेगार कैलाश शिंदे रा. वसमत, सुनिल खिल्लारे रा. म्हातारगाव (ता. वसमत) यांनी मोबाईल चोरला असून त्यांनी इतर इसमाला विक्री केला आहे अशी खात्रीशिर माहीती मिळाल्यावरुन पोलिस पथकाने म्हातारगाव येथील सुनिल खिल्लारे यास ताब्यात घेतले. त्याची विचारपुस केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली.

धाब्यावर थांबलेल्या ट्रकमधून मोबाईल लंपास करत होते.

तसेच वसमत येथील कैलास शिंदे व मी असे दोघांनी अंदाजे वीस दिवसापुर्वी बहीर्जी कॉलेजसमोर रोडने रेल्वे पुलाजवळ दोन मुले पायी येत असतांना आम्ही त्याचे जवळीक रेडमी कंपणीचा मोबाईल त्यांचे खिशातून नजर चुकवून काढून घेतला आहे असे सांगून सदर गुन्ह्यातील चोरलेला रेडमी कंपणीचा मोबाईल स्वताः जवळून काढून दिला. सदर आरोपीतास पथकाने विश्वासात घेवून अधिक विचारपूस केली. सदर आरोपीने सांगीतले की, कैलाश शिंदे व मी असे आम्ही दोघे मिळून मागील एक वर्षामध्ये औंढा ते नांदेड जाणारे महामार्गालगत असणाऱ्या ढाब्यावर मुक्कामी थांबलेल्या ट्रकचे कॅबीनमध्ये जावून झोपलेल्या ट्रक चालक व क्लिनर यांचे बरेच मोबाईल चोरले असून ते आम्ही स्वता : चे आहेत असे सांगुन भेंडेगाव, धामनगाव, चौंढी, शिरड शहापुर , म्हातारगाव येथील इसमांना कमी भावात विक्री केली आहे असे सांगीतले.

पथकाचे वरिष्ठांकडून कौतुक

पोलिस पथकाने संबधीत इसमाकडून सदर चोरीचे मोबाईल जप्त केले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकूण ३३ अँन्ड्राईड मोबाईल किमती अंदाजे तीन लाख ८९ हजार रुपये किमतीचे अँन्ड्राईड मोबाईल जप्त करून ट्रक चालकाला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. तसेच सदर गुन्ह्यातील फरार आरोपी कैलाश शिंदे हा चोरी, घरफोडी, दरोडा, खून, खुनासह दरोडा या सारख्या गुन्ह्यात सराईत असुन त्याचे विरुध्द यापुर्वी सुध्दा जिल्ह्यात व इतर जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक के. डी. पोटे, एस. एस. घेवारे, सहाय्यक बालाजी बोके तसेच विलास सोनवणे, भगवान आडे, विठ्ठल कोळेकर, विशाल घोळवे, राजु ठाकुर, ज्ञानेश्वर सावळे, किशोर सावंत, आकाश टापरे, विठ्ठल काळे, ज्ञानेश्वर पायघन, सायबर सेलचे जयप्रकाश झाडे, सुमित टाले, चालक शेख जावेद यांनी केली असल्याचे सांगितले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे