Hingoli : लोकनेते गोपीनाथ मुंडे व्याख्यानमालेला सोमवारपासून सुरुवात होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gopinath Munde

Hingoli : लोकनेते गोपीनाथ मुंडे व्याख्यानमालेला सोमवारपासून सुरुवात

हिंगोली : येथे श्रीसंत भगवान बाबा प्रतिष्ठानातर्फे तीनदिवसीय लोकनेते गोपीनाथ मुंडे व्याख्यानमालेला सोमवारपासून (ता. १२) सुरुवात होणार आहे. सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टचे अध्यक्ष यशवंत गोसावी यांचे ‘आम्ही समतेचे वारकरी’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थानी सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे आहे. उद्‍घाटन आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते होणार आहे. मंगळवारी माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्या हस्ते उद्‍घाटन होणार आहे.

अध्यक्षस्थानी आमदार तान्हाजी मुटकुळे राहणार आहेत. कवी प्रा. डॉ. विठ्ठल जायभाये यांचे ‘लोकनेते गोपीनाथराव मुंडे’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. बुधवारी (ता. १४) धर्मदाय आयुक्त रवींद्र धायतडक यांच्या हस्ते उद्‍घाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी महिला व बालविकास विभागाचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी गणेश वाघ राहणार आहेत. प्राचार्य डॉ. विठ्ठलराव घुले हे ‘बहुजन समाज आणि ओबीसी राजकारण’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.