Hingoli: शिवसैनिकांनी खंबीरपणे पक्षप्रमुखांच्या मागे उभे राहावे ;आ. संतोष बांगर

आमदार संतोष बांगर कळमनुरीत स्वागताचा कार्यक्रम
MLA Santosh Bangar
MLA Santosh Bangarsakal

कळमनुरी : शिवसेना पक्षांतर्गत झालेली उलथापालथ पाहता मागील काही दिवसांपासून मुंबईत असलेले शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांचे शनिवारी (ता. २५) शहरात आगमन होताच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी आमदार श्री. बांगर यांनी पक्षावर आलेल्या संकटाच्या काळात शिवसैनिकांनी खंबीरपणे पक्षप्रमुखांच्या मागे उभे राहावे, असे आवाहन पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले.

विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेना पक्ष अंतर्गत मोठी उलथापालथ झाली आहे. शिवसेनेचे अनेक मंत्री, आमदार यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे, या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत राहण्याचा निर्णय घेतला, पक्षांतर्गत मोठी फूट पडल्यानंतरही आमदार संतोष बांगर यांनी आपण सच्चे शिवसैनिक असून, कायमच शिवसेनेतच राहणार असल्याचा निर्वाळा कार्यकर्त्यांना दिला.

या सर्व घडामोडीत आमदार श्री. बांगर मागील काही दिवसांपासून मुंबईत वास्तव्याला होते. शुक्रवारी त्यांचे जिल्ह्यात आगमन झाले, शनिवारी सकाळी त्यांचे कळमनुरी शहरात फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी उत्तमराव शिंदे, रामभाऊ कदम, बंडू पाटील, आप्पाराव शिंदे, संतोष सारडा, राजू संगेकर, संभाजी कराळे, गणेश गुठ्ठे, सतीश खर्जुले, गुणानंद पतंगे, दादाराव डुरे, बाळू पाटील, सुहास पाटील, अनिल बुरसे, शिवराज पाटील, मयूर शिंदे, ॲड. रवी शिंदे, साहेबराव जाधव, पप्पू गुठ्ठे, रामराव म्हस्के, संभाजी सोनुने, आर. आर. पाटील, सुनील पवार, पिंटू गडदे, शुभम नाईक, अक्षय ढगे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, आमदार बांगर यांनी आखाडा बाळापूर, वारंगा फाटा, डोंगरकडा येथे भेटी देऊन पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com