हिंगोली : खेड ग्रामपंचायतवर शिवशाही पॅनल बिनविरोध 

राजेश दारव्हेकर
Friday, 25 December 2020

कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील  व हिंगोली तालुक्यातील  खेड येथे  सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम अंतर्गत आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे व  आमदार संतोष बांगर  यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत खेड येथील गावकऱ्यांनी शिवशाही पॅनलच्या उमेदवारांना बिनविरोध निवडून दिले.

हिंगोली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार व शिवसेना जिल्हाप्रमुख तथा  आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात खेड येथे शिवशाही पॅनलचा भगवा बिनविरोध फडकला सात जागेसाठी सातच अर्ज दाखल झाले आहेत.

कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील व हिंगोली तालुक्यातील खेड येथे सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम अंतर्गत आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत खेड येथील गावकऱ्यांनी शिवशाही पॅनलच्या उमेदवारांना बिनविरोध निवडून दिले. खेड गावातील सर्व जनतेस आमदार बांगर गावच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र आणले आणि खेड ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आणण्यासाठी मोलाची भूमिका बजावली.

हेही वाचा - नाताळ सणाच्या गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना -

यावेळी खेडच्या सरपंचपदी सर्वानुमते बिनविरोधपणे सुदाम नागरे यांची  सरपंच तर उपसरपंचपदी दिनकर गंगावणे यांची निवड करण्यात आली. तर सदस्य म्हणून भाग्यश्री नागरे, सुधाकर गंगावणे, सखुबाई सुधाकर गंगावणे, अनिता गंगावणे, सत्यभामा गंगावणे यांची निवड करण्यात आली. यावेळी पंचायत समिती सदस्य त्र्यंबक गंगावणे, हिंगोली नगरपालिकेचे बांधकाम सभापती श्रीराम बांगर यांच्यासह यावेळी चेतन नागरे, अजय नागरे अनिल नागरे, अनिकेत नागरे, गजानन नागरे, संतोष नागरे, जनार्दन नागरे, उत्तम गंगावणे, प्रभाकर गीते, रघुनाथ नागरे, आकाश कांदे, बालाजी बांगर, गोपाल बांगर,विशाल बांगर, वैजनाथ नागरे आदी उपस्थित होते.

 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Shivshahi panel on Khed Gram Panchayat unopposed nanded news