
हिंगोली : एसटी कर्मचाऱ्याने घेतला गळफास; आत्महत्येने खळबळ
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर हल्ला केल्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर खोटे आश्वासन देऊन एसटी कमचाऱ्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशात वसमत आगारातील एका एसटी कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (ST employee took the gallows)
मागील तीन-चार दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन गुणरत्न सदावर्ते यांच्याभोवताल फिरत आहे. अशात वसमत आगारातील एका एसटी कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. मृत एसटी कर्मचाऱ्याचा मृतदेह वसमत उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. या घटनेने हिंगोली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा: मोदींनी केली भूमिका स्पष्ट; म्हणाले, पुतिन व झेलेन्स्की यांनी चर्चा करावी
अकोला व पुण्यासह काही ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पैसे घेतल्याचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आजपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांसाठी लढणारे वकील गुणरत्न सदावर्ते कोठडीत आहे. तसेच त्यांच्यावर विविध आरोप केले जात आहे. अशात आपली फसवणूक झाली असावी या विचारातून एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
Web Title: Hingoli St Employee Took The Gallows Sensation Of Suicide Crime News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..