Hingoli : हळद संशोधन केंद्र व भाभा अणुसंशोधन केंद्र यांच्यात सामंजस्य करार Hingoli Turmeric Research Center and Bhabha Atomic MP Hemant Patil | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खासदार हेमंत पाटील

Hingoli : हळद संशोधन केंद्र व भाभा अणुसंशोधन केंद्र यांच्यात सामंजस्य करार

हिंगोली : जिल्ह्यातील वसमत तालुक्‍यातील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि मुंबईचे भाभा अणुसंशोधन केंद्र यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. या करारामुळे हळद संशोधन केंद्राचे काम अधिक जलद गतीने व गुणवत्तापूर्ण होईल.

भाभा अणुसंशोधन केंद्राकडे अद्ययावत प्रयोगशाळा, विषय तज्ज्ञ, तंत्रज्ञान, शास्त्रज्ञ उपलब्ध असल्यामुळे हळदीच्या जातींची रोपे कमी वेळात व अधिक प्रमाणात जैवतंत्रज्ञान अर्थात, टिश्यू कल्चरच्या साहाय्याने तयार करणे शक्‍य होणार आहे. त्यामुळे जास्तीत- जास्त शेतकऱ्यांना उत्तम दर्जाची रोपे वाटता येतील. तसेच अणू उत्सर्जन क्रियेद्वारे हळदीच्या नवीन जातींचा शोध घेणे सुलभ होणार आहे.

या करारावेळी बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा खासदार हेमंत पाटील व ब्रिट (बोर्ड ऑफ रेडिएशन ॲण्ड आयसोटोप टेक्नॉलॉजी) केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रदीप मुखर्जी यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी खासदार हेमंत पाटील यांच्या दूरदृष्टीतून व शाश्वत विकासाच्या संकल्पनेतून मूर्त स्वरूप प्राप्त झालेल्या हरिद्रा प्रकल्पास डॉ. मुखर्जी यांनी शुभेच्छा दिल्या.

भाभा अणुसंशोधन केंद्राकडे उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे हळदीची गुणवत्ता, साठवण कालावधी वाढल्यामुळे पर्यायाने हळदीची निर्यात वाढणार आहे. या प्रकल्पाची क्षमता दर दिवसाला १०० मेट्रिक टन असून, वर्ष अखेर कमीत कमी ३० ते ५० हजार मेट्रिक टन ‘आय रेडिएशन’ तंत्रज्ञानाच्या मदतीने निर्यात होणार आहे.

हे तंत्रज्ञान भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरने तयार केले असून, या विकिरण-तंत्रज्ञानाच्या मदतीने हळद उत्पादन वाढीबरोबरच इतर पिकांचीही (डाळी, तेलबिया) गुणवत्ता व उत्पादन वाढ असा दुहेरी फायदा होणार आहे. तसेच विदर्भातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचे ध्येय गाठण्यासाठी हरिद्रा या केंद्राचा मोलाचा वाटा असणार आहे, असा विश्वास खासदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केला.