esakal | हिंगोली : जमिनीतील गुढ आवाजाने गावकऱ्यांची उडाली झोप, पोतरा, सिंदगी येथे झाला आवाज
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

कळमनुरी तालुक्यातील पोतरा व सिंदगी येथे मागच्या काही दिवसांपूर्वी जमीनीतुन आवाज झाला होता. त्यानंतर परत रविवारी आवाज आला आहे.

हिंगोली : जमिनीतील गुढ आवाजाने गावकऱ्यांची उडाली झोप, पोतरा, सिंदगी येथे झाला आवाज

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली :  कळमनुरी तालुक्यातील पोतरा, सिंदगी गावात रविवारी (ता. २०) भल्या पहाटे  जमीनीत एक गुढ आवाज झाला या आवाजाने गावकऱ्यांची झोप उडाली. यामुळे गावकरी भयभीत झाले आहेत.

कळमनुरी तालुक्यातील पोतरा व सिंदगी येथे मागच्या काही दिवसांपूर्वी जमीनीतुन आवाज झाला होता. त्यानंतर परत रविवारी आवाज आला आहे. हा आवाज याच दोन गावात झाल्याचे गावकरी सांगत आहेत. दरम्यान, या भागात असलेल्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे  गावात जमीनीतुन आवाज झाल्यावर अनेक गावात जमीनीतुन आवाज होतात रविवारी मात्र पांगरा शिंदे गावात असा आवाज झाला नसल्याचे माधव शिंदे यांनी सांगितले. 

हेही वाचा - नांदेड : दहावी व बारावी परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणीस मुदतवाढ -

पोतरा व सिंदगी गावात भल्या पहाटे ४. ४० वाजता जमिनीतुन आवाज झाल्याने गावकरी खडबडून जागे झाले. काय झाले म्हणून घराबाहेर पडले व गावात कुठे काय झाले का याची चर्चा करीत होते. या आवाजाने गावात कोणतेही नुकसान झाले नाही मात्र आवाजाने गावकरी भयभीत झाले आहेत. या बाबत प्रशासनाकडे ही माहिती कळविली असल्याचे सिंदगी येथील चेअरमन प्रताप मगर, कल्याण मगर, गोविंद मगर तर पोतरा येथील माजी सरपंच रामराव मुलगीर, शिवदास लासुरे,  पुरभाजी कोठूळे यांनी सांगितले. या गावात होणाऱ्या आवाजाने गावकरी भयभीत झाले असून प्रशासनाने या आवाजाचे गुढ उकलावे अशी मागणी केली जात आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image
go to top