हिंगोली : सायकलवर केला हिमाचलचा प्रवास

अंकुर प्रतिष्ठानच्या वतीने वसमत येथे सायकलपटूंचा सत्कार
Travel to Himachal by cycle
Travel to Himachal by cycle

वसमत : सायकलवर हिमाचल प्रदेशाचा दौरा करून आलेल्या सायकलपटूंचा सत्कार रविवारी बहिर्जी स्मारक विद्यालयाच्या प्रांगणात अंकुर प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष वीरभद्र बेडके होते. विद्यालयाचे नवीन शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. वसमत येथील सायकलपटू तिबेट बॉर्डरहून चिटकूल, सांगितला कल्पा-पूह, नाको ताबो, मह व्हिलेज, मॉनेस्टरी व परत मनाली मार्गे असा नऊ दिवस सायकलचा प्रवास करून वसमत येथे परतले. यामध्ये डॉ. महेश रावतोळे, विनायक गुडेवार, नितीन कांबळे, आशिष सालमोठे, संदीप वाघमारे, सूर्यवंशी, प्रशांत स्वामी यांचा समावेश आहे. त्यांच्या या धाडसाचे कौतुक म्हणून प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

सत्कारमूर्तींनी प्रवासातील अनुभव व सायकलिंगचे महत्त्व सांगितले. प्रशांत स्वामी यांनी सायकलिंगचे शारीरिकदृष्ट्या महत्त्व विशद करून मानसिकदृष्ट्यासुद्धा व्यक्तीला कणखर बनायचे असेल तर नियमित सायकल चालवण्याचा सराव करावा, असे सांगितले. सालमोठे आणि वाघमारे यांनीही मनोगत व्यक्त केले. अंकुर प्रतिष्ठानचे अध्यक्ष वीरभद्र बेंडके यांनी ‘अंकुर प्रतिष्ठान’ स्थापन करण्यामागची भूमिका सांगितली. बाळासाहेब बेले यांनी सूत्रसंचालन केले. कल्याण कुरुंदकर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी अंकुर प्रतिष्ठानचे ॲड. प्रदीप देशमुख, संजीवकुमार बेंडके, विजय बेंडके, मनीष लालपोलू, गणेश गायकवाड संतोष परसवाळे, कुणाल बोबडे, पंकज मुळे, संदीप टाक, गजानन साळवे, अरुण आंबेकर अशोक पडोळे यांनी पुढाकार घेतला.

हृदयक्षमता, फुफ्फुसक्षमता वाढवण्यासाठी नियमित सायकल चालवा. आयुष्य निरोगी होईल. कोणताही छंद व्यक्तीला नैराश्यातून बाहेर येण्यास मदत करतो. फिरण्यामुळे व्यक्तीचे मन उल्हासित होऊन काम करण्याची क्षमता तयार होते.

- डॉ. महेश रावतोळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com