हिंगोली तालुक्यात पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्याला मारहाण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

हिंगोली : गेल्या काही दिवसांपासून शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याच्या रोजच नव्या घटना ऐकायला मिळतात. हिंगोलीतही पाणीपुरवठा विभागाच्या बेभरोसे कारभागाराचा फटका कळमनुरी नगरपरिषदेच्या एका पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्याला बसला असून त्याला रहीवाशाने मारहाण केल्याची घटना घडली आहे.

हिंगोली : गेल्या काही दिवसांपासून शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याच्या रोजच नव्या घटना ऐकायला मिळतात. हिंगोलीतही पाणीपुरवठा विभागाच्या बेभरोसे कारभागाराचा फटका कळमनुरी नगरपरिषदेच्या एका पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्याला बसला असून त्याला रहीवाशाने मारहाण केल्याची घटना घडली आहे.

नळ कनेक्शन दिले नसल्याच्या कारणावरून हिंगोलीतील कळमनुरी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची माहिती मिळत आहे. वेळी अवेळी जाणारे पाणी, कमी दाबाचा पाणी पुरवठा,नळ कनेक्शन बदलण्यास होणारा विलंब या सर्वांचा संताप अशा घटनांमधून व्यक्त होत असल्याचे बोलले जात आहे. कळमनुरी नगर परिषद कार्यालयातील कर्मचारी सुभाष काळे हे दररोजच्या प्रमाणे ऑफीसमध्ये कामकाज पाहत होते. त्याचवेळी सुनिल संभाजी खरात नावाच्या इसमानं त्याच्याकडे नळ कनेक्शन का आले नाही याबाबत विचारणा केली. याबाबत सुभाष काळे यांनी काही कारणास्तव विलंब होत असल्याचा खुलासा करीत असतानाच त्या रहीवाशाला संताप अनावर झाला आणि कर्मचाऱ्याला मारहाण सुरू केली. या घटनेबाबत कर्मचाऱ्याने आरोपी सुनील संभाजी खरात विरोधात कळमनुरी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

कर्मचाऱ्यांना सहकार्याची अपेक्षा
तांत्रिक अडचणीमुळे पाण्या्च्या समस्या निर्माण होतात, कर्मचारीदेखील तत्परतेने त्या सोडवण्याचा प्रयत्न करतात, परंतु नैसर्गिक आपत्ती आल्यास किंवा वेळेवर सामग्री उपलब्ध न झाल्यास पाणी विभागाच्या समस्या सोडविण्यास विलंब होऊ शकतो. मात्र कर्मचारी हा देखील माणूसच आहे. अशा हल्ल्यांमुळे कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचले जात असल्याची भावना पाणी पुरवाठा विभागाचे कर्मचारी व्यक्त करीत आहेत आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांसह नागरिकांच्या सहकाऱ्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: hingoli water shortage issue becomes serious