हिंगोली : टरबुजाची कवडीमोल दराने विक्री

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, लागवड खर्चही निघेना
Hingoli Watermelon selling at low prices farmers loss
Hingoli Watermelon selling at low prices farmers losssakal

आखाडा बाळापूर : आखाडा बाळापूर परिसरामधील अनेक शेतकरी बांधवांनी या वर्षी टरबुजाची लागवड केली होती. परंतु, उन्हाळा संपत आला तरीही टरबुजाचे भाव कमीच आहेत. यामुळे उत्पादकांना थेट बाजारात कवडीमोल भावाने टरबुजाची विक्री करावी लागत आहे. यामुळे झालेला खर्च देखील निघत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

आखाडा बाळापूर परिसरातील शेवाळा, कानेगाव, देवजना, कवडी, पिंपरी घोडा या भागातून कयाधू नदी वाहते. काही भागात नदीला असलेल्या पाण्यामुळे विहिरीची पाणी पातळी वाढते. यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी यावर्षी टरबुजाची लागवड केली होती.

तसेच टरबुजाला यंदाच्या उन्हाळ्यात कोरोना दूर झाल्याने चांगला भाव मिळेल, अशी आशा अनेकांनी होती. परंतु, मे महिन्याच्या सुरवातीलाच टरबुजाचे मोठ्या बाजारपेठेत भाव पडल्याने शेतकऱ्यांना थेट बाजारात वाहनाद्वारे कवडीमोल भावाने माईक हातात घेऊन विक्री करावी लागत आहे.

वरील गावातील सुमारे शंभर एकरावर अनेक शेतकऱ्यांनी टरबुजाची लागवड केली होती. नंतर व्यवस्थित देखरेख आणि इतर खर्च करूनही शेतकऱ्यांच्या हाती काहीच पडत नसल्याचे सांगितले जात आहे. शहरातील बाजारपेठेत टरबुजाची आवक वाढल्याने भाव पडले आहेत. आखाडा बाळापूर येथील मंगळवारी आठवडी बाजाराच्या दिवशी अनेक शेतकऱ्यांनी वाहनाद्वारे माईक लावून वीस रुपयाला पाच टरबूज या प्रमाणे थेट बाजारात विक्री केली. परंतु, ग्राहकांचा अल्पसाच प्रतिसाद दिसून आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com