हिंगोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अपघातात बचावले 

file photo
file photo

हिंगोली : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले हे शुक्रवारी (ता. नऊ)  दुपारच्या सुमारास शासकीय निवास्थानाकडे तहसील कार्यालयपासून जात असताना टिप्परने त्यांच्या सरकारी गाडीला जोरदार धडक दिल्याने गाडीचे नुकसान झाले असून त्यांनाही मारहाण करण्यात आल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवरून दिसून येते.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले हे त्यांच्या हिंगोली येथील शासकीय निवासस्थानाकडे ओव्हर ब्रिजपासून तहसील कार्यालय जवळून शासकीय वाहनातून  (एम एच ३८ जी १००९) जात असताना अचानक एका टिप्परने शासकीय अधिकाऱ्याची गाडी समजून वाळूचा पाठलाग करीत आहे की, काय असे समजून तसेच भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परला श्री बेले यांनी हात दाखविला  मात्र  त्यांच्या गाडीवर टिप्परने धडक दिली यात शासकीय कारचे नुकसान तसेच चालकाचे नियंत्रण सुटल्याने हे टिप्पर एका बंद असलेल्या ज्युस सेंटरमध्ये घुसले नंतर बेले वाहनातून उतरल्यावर त्यांचा टिप्पर चालकासोबत वाद झाला.

यावेळी काही  तरुणांनी अध्यक्ष बेले यांना मारहाण केली यात ते बचाव करीत त्यांनी तेथून सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती होण्यासाठी गेले असता, त्याठिकाणी देखील या युवकांनी रुग्णालयात हजर झाले, यावेळी गणाजी बेले यांनी शहर पोलीस ठाण्यात दूरध्वनी करून पोलिस गाडी पाठविण्याचे सांगितले, त्यानंतर गाडी रुग्णालयात दाखल होताच त्यांनी मोकळा श्वास सोडला. त्यानंतर गणाजी बेले यांनी खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले तेंव्हा त्यांच्या हाताला मुक्का मार लागला आहे, त्यावरून डॉक्टरांनी त्यांच्या हाताला प्लास्टर केले आहे. अद्याप अध्यक्ष बेले यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याने त्यांनी  गुन्हा दाखल केला नाही. मात्र अध्यक्ष बेले यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com