esakal | हिंगोलीची निसर्ग शाळा पोचली साता समुद्रापार; सौदी अरेबीयातून निसर्गाच्या शाळेत प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

हिंगोलीची निसर्ग शाळा

हिंगोलीची निसर्ग शाळा पोचली साता समुद्रापार; सौदी अरेबीयातून निसर्गाच्या शाळेत प्रवेश

sakal_logo
By
राजेश दार्वेकर

हिंगोली : निसर्ग शाळेच्या सहाव्या आणि सातव्या तुकडीचे उद्घाटन गुरुवारी ( ता. १०) अविनाश महाराज भारती यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्रातील जिल्ह्यासह गोवा, आंध्रप्रदेशसह सौदी अरेबीयातून मराठी भाषिक विद्यार्थी शाळेत उपस्थित होते.

एक मुल तीस झाडे अभियानातंर्गत निसर्गाच्या शाळेची सुरुवात एक मे २०२१ रोजी झाली. आणि शाळेचा हेतू लक्षात घेता ही शाळा महाराष्ट्रभर पोहचली. पालभर, मुंबई, नाशिक, रायगड, ठाणे, नवी मुंबई, नागपूरसह महाराष्ट्रातील ३१ जिल्ह्यात पोहचली. गोव्यातील तीन भागात तर आंध्रातील हैद्राबाद व सौदी अरेबियातील आर्यन आणि गौरवी या दोन विद्यार्थ्यांचा प्रवेश शाळेत झाला आहे. १४ वर्षाखालील ८०० च्या वर विद्यार्थी या शाळेत शिकतात.

हेही वाचा - हिंगोली जिल्ह्यातील नरसी येथे श्री संत नामदेव किर्तन महोत्सवास दोनशे दिवस पूर्ण

१४ वर्षाखालील मुलांच्या अंगी शेती, माती, झाड, पाणी, एकूणच निसर्गाच्या विषयी जाणीवा तयार होऊन निष्ठा निर्माण होण्यासाठी ही शाळा काम करते. मुलांनी निरोगी आयुष्य जगण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात जाणे गरजेचे आहे. फक्त निसर्गाचा अयोग्य उपभोग घेण्यापेक्षा निसर्गाच्या सानिध्यात जाऊन त्याचे जतन करत योग्य उपभोग घेणे काळाची गरज आहे. अशी शाळेची धारणा आहे.

ही शाळा आठवड्यातून एक दिवस, एक घंटा असते. बाकीची दिवस कृती असते. या शाळेतील पहिल्या पाठाअंतर्गत ३०० विद्यार्थी घरच्याघरी फळझाडांची रोपवाटीका तयार करायला लागली आहेत. नियोजित अभ्यासक्रम, अनेक उपक्रम, प्रकल्प या शाळेत आहेत तद्वतच परिक्षा, अभ्यासक्रम प्रमाणपत्र, बक्षिसे शाळेत आहेत. त्याच बरोबर दर आठवड्याला उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार दिल्या जातो. महाराष्ट्रातील पन्नासच्यावर तज्ञ मार्गदर्शक या शाळेत मार्गदर्शक करतात. प्रा. ज्ञानोबा ढगे, रवी देशमुख, बालासाहेब राऊत, प्रेमानंद शिंदे, बाळू बुधवंत, श्याम राऊत, गोविंद दळवी, विलास जाधव, अनिता गायकवाड, सदा वडजे, रतन आडे, संजय मुसळे, प्रा. रेवती गव्हाणे ही एक मुल तीस झाडे अभियानाची शिक्षकमित्र शाळेला मदत करतात. शाळा मुलांचे भविष्य घडवत नाही तर मुलांना भविष्यासाठी घडवते. असे निसर्ग शाळेचे प्रमुख आण्णा जगताप यांनी सांगितले.

येथे क्लिक करा - भोकरमध्ये नव्या इमारतीच्या उद्घाटनापूर्वीच फुटले वादाचे 'नारळ'

या कोरोनाच्या काळात पालकासह मुलं भविष्या विषयी चिंतेत आहेत. पद, पैसा, प्रतिष्ठेच्या पुढे जाऊन निरोगी जगणे महत्त्वाचे झाले आहे. शेती, माती, झाड, पाणी, एकूणच निसर्गाला समजून घेऊन निसर्गाचे जतन करत योग्य उपभोग घेतला तरच निरोगी जगता येते हे आता सर्वांना समजले असल्याचे श्री जगताप म्हणाले.

संपादन- प्रल्हाद कांबळे