'स्वच्छ ग्राम' स्पर्धेत हिवरेबाजार प्रथम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

औरंगाबाद : राज्य शासनातर्फे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत देण्यात येणाऱ्या 2016-17 च्या "तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम' या राज्यस्तरीय प्रथम पुरस्काराचा मान (25 लाख रुपये) हिवरेबाजार (ता. जि. नगर) ग्रामपंचायतीने पटकाविला आहे. तर द्वितीय विभागून (प्रत्येकी 10 लाख रुपये) मन्याचीवाडी (ता. पाटण, जि. सातारा) व शेळगाव गौरी (शेळगाव, ता. नायगाव, जि. नांदेड), तर तिसरा विभागून (प्रत्येकी साडेसात लाख रुपये) धाटाव (ता. रोहा, जि. रायगड) व राजगड (ता. मूल, जि. चंद्रपूर) यांना जाहीर झाला. 

पुरस्कारांची घोषणा गुरुवारी (ता. सहा) पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी पत्रकार परिषदेत येथे केली असून, शनिवारी (ता. आठ) येथे वितरण सोहळा होणार आहे.
मंत्री लोणीकर म्हणाले, की पुरस्कारांचे शनिवारी सकाळी 11 वाजता सिडकोतील संत तुकाराम महाराज नाट्यगृहात वितरण होईल. अध्यक्षस्थानी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे असतील. तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची उपस्थिती राहील. 

दरम्यान, गावपातळीबरोबरच आता स्वच्छ वॉर्डासाठीही पुरस्कार देण्यात येणार आहे. येत्या वर्षभरात हे पुरस्कार जाहीर केले जातील, असेही लोणीकर यांनी स्पष्ट केले.

विशेष पुरस्कार
तीन ग्रामपंचायतींना प्रत्येकी तीन लाख रुपये रोख रकमेचे विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आले. यामध्ये पाणी व सांडपाणी व्यवस्थापन क्षेत्र वसंतराव नाईक पुरस्कार (तीन लाख रुपये) अवनखेड (ता. दिंडोरी, जि. नाशिक), कुटुंबकल्याण क्षेत्र - आबासाहेब खेडकर पुरस्कार देवगाव (ता. अचलपूर, जि. अमरावती) आणि सामाजिक एकता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार पांगारखेड (ता. मेहकर, जि. बुलडाणा) यांना मिळाला.

विभागस्तरावरील प्रथम, द्वितीय पुरस्कार

विभागस्तरावर 10 लाख प्रथम, तर 8 लाख रुपये रोख असा द्वितीय पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये औरंगाबाद विभागात प्रथम - धामणगाव (ता. शिरूर, जि. लातूर), द्वितीय - शेळगाव गौरी (ता. नायगाव, जि. नांदेड), अमरावती विभागात प्रथम - पांगारखेड (ता. मेहकर, जि. बुलडाणा), द्वितीय - देवगाव (ता. अचलपूर, जि. अमरावती), नागपूर विभागात प्रथम - शिवनी (मो.) (ता. लाखणी, जि. भंडारा), द्वितीय - राजगड (ता. मूल, जि. चंद्रपूर), नाशिक विभाग प्रथम - हिवरेबाजार (ता.जि. नगर), द्वितीय - अवनखेड (ता. दिंडोरी, जि. नाशिक), पुणे विभाग प्रथम - मन्याची वाडी (ता. पाटण, जि. सातारा), द्वितीय - चाकण (ता. खेड, जि. पुणे), कोकण विभाग प्रथम - धाटाव (ता. रोहा, जि. रायगड), द्वितीय - आंदुर्ले (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hirave Bajar First in the Clean Village competition