हेरिटेज वॉकच्या माध्यमातून उलगडला पाणचक्कीचा इतिहास 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

पाणचक्की हे आपल्या काळचे जगातील सर्वोत्तम अध्ययन केंद्रांपैकी एक होते. येथे असलेले ग्रंथालय आशिया खंडातील सर्वात मोठ्या ग्रंथालयांपैकी एक होते. येथील अनेक हस्तलिखिते स्वतः राजा महाराजांनी लिहून ठेवलेली आहेत ज्याला सोन्याचा मुलामा आहे आणि ज्यांचे वय तीनशे वर्षांपेक्षा जास्ती आहे.

औरंगाबाद : पाणचक्की हे आपल्या काळचे जगातील सर्वोत्तम अध्ययन केंद्रांपैकी एक होते. येथे असलेले ग्रंथालय आशिया खंडातील सर्वात मोठ्या ग्रंथालयांपैकी एक होते. येथील अनेक हस्तलिखिते स्वतः राजा महाराजांनी लिहून ठेवलेली आहेत ज्याला सोन्याचा मुलामा आहे आणि ज्यांचे वय तीनशे वर्षांपेक्षा जास्ती आहे. पाणचक्कीच्या अश्या अनेक पैलूंवर रविवारी (ता. २१) हेरिटेज वॉकच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला. 

अनेक महिन्यांपासून खंडित झालेली शहरातील हेरिटेज वॉकची परंपरा रविवारी पुन्हा एकदा सुरु झाली. शहरातील लोकांना शहरातील ऐतिहासिक वारसा माहिती व्हावा यासाठी औरंगाबाद हिस्ट्री सोसायटी आणि डॉ. दुलारी कुरेशी, रफत कुरेशी यांनीं एकत्र येऊन हा उपक्रम पून्हा सुरु केला. याला शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद रविवारी पाणचक्कीत जोरदार हजेरी लावली. यात विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे डॉ. शिवकांत बाजपेयी, डॉ. बिना सेंगर, अजय ठाकूर, प्रदीप देशपांडे, आदींची उपस्थिती होती.

Web Title: history of panchakki in aurangabad

टॅग्स