‘त्या’ होम क्वारंटाइन कर्मचाऱ्यास शोधले

‘त्या’ होम क्वारंटाइन कर्मचाऱ्यास शोधले

परभणी : होम क्वारंटाइन असतानाही बाहेर फिरत असलेल्या एका कर्मचाऱ्यास बुधवारी (ता.आठ) नवामोंढा पोलिसांनी शोधून जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या स्वाधीन केले.
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेली व्यक्ती किंवा परजिल्ह्यातून परभणीत आलेल्या व्यक्तीची तपासणी करून त्यास होम क्वारंटाइन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावलेले आहेत. विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करू लागले आहे. यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी सर्वतोपरी मदत करू लागले आहेत. संशयित असलेल्या रुग्णांचे स्वॅब घेऊन पुणे येथील प्रयोग शाळेत पाठविले जात आहेत. त्यांचे अहवाल आल्यानंतर संबंधितांना होम क्वारंटाइन केल्या जात आहे. 

अडीच वाजता पळून गेला
हिंगोली जिल्ह्यातील एका कर्मचाऱ्यांस वैद्यकीय अधिकाऱ्यांनी होम क्वारंटाइन केले होते. मात्र, ती व्यक्ती बुधवारी (ता.आठ) भल्या पहाटे अडीच वाजता पळून गेली. ही बाब लक्षात येताच वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तातडीने पावले उचलली. नवामोंढा पोलिसांशी संपर्क साधला. नवामोंढा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर तट यांनी तातडीने संबंधित कर्मचाऱ्याचा शोध सुरू केला. सकाळी अकराच्या सुमारास तो पोलिस व वैद्यकीय पथकास सापडला. त्यास उपस्थितीत वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेत पुन्हा होम क्वारंटाइन केल्याची माहिती पोलिस निरीक्षक रामेश्वर तट यांनी दिली.

अफवांचा ऊत
शहरातील खानापूर परिसरात बुधवारी काही जणांना नोटा सापडल्या. त्या कोरोनाबाधित व्यक्तीने टाकल्याचे म्हटले. ही बाब नवामोंढा पोलिसांना समजली. पोलिस निरीक्षक रामेश्वर तट यांनी तातडीने संबंधित व्यक्तीचा शोध घेत त्यास ताब्यात घेतले. व जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठविल्याची माहिती श्री. तट यांनी दिली. दरम्यान, करोना विषाणूसंदर्भात नागरिकांनी अफवा पसरवू नये, अशा अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील, असे पोलिस निरीक्षक रामेश्वर तट यांनी म्हटले आहे.


हेही वाचा...
 हातभट्टीवर छापा; मुद्देमाल जप्त
पूर्णा (जि.परभणी): सुकी (ता. पूर्णा) येथील दिलीप देवराव जाधव यांच्या शेतातील हातभट्टीवर पूर्णा पोलिसांनी मंगळवारी (ता. सात) छापा टाकत सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक रमाकांत नागरगोजे यांनी मिळालेल्या माहितीनुसार दिलीप देवराव जाधव ( रा. सुकी) यांच्या शेतातील सिंधीच्या झाडाखाली हातभट्टीवर छापा टाकला. उग्रवास येणारे रसायन ( किंमत १२०० रुपये) , गूळ (किंमत ५०० रुपये) , नवसागर ( किंमत ३०० रुपये) , २५ लिटर दारू (किंमत ५००० रुपये) असा एकूण सात हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. या वेळी दिलीप जाधव पोलिसांना पाहून पळून गेला असून पूर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com