मोबाइल कॉलवर घरपोच खरबूज

Himayatnagat kharbooj
Himayatnagat kharbooj

हयातनगर (जि. हिंगोली) : वसमत तालुक्‍यातील हयातनगर येथील एका शेतकऱ्याने लॉकडाउनमुळे आठवडे बाजार बंद झाल्याने व्हॉट्सॲपग्रुपच्या माध्यमातून खरबूज विक्रीची शक्कल लढवित विक्री सुरू केली आहे. तसेच एका मोबाइल कॉल घरपोच खरबूज उपलब्ध करून दिले जात आहे. यातून आतापर्यंत खर्च वजा जाता त्‍यांना तीस हजारांचा निव्वळ नफा मिळाला आहे.

वसमत तालुक्यातील हयातनगर येथील शेतकरी बाळू नवनाथ मेहत्रे यांच्याकडे वडिलापोर्जित शेती आहे. त्‍यांच्या शेतात पाण्याचीदेखील व्यवस्‍था आहे. त्‍यांनी या वर्षी २० गुंठ्यात खरबुजाची लागवड केली आहे. त्‍यासाठी योग्य नियोजन करून देखभाल करीत त्‍याची जोपासणी केल्याने चांगली फळे लगडली आहेत. 

व्हॉट्सॲपच्या माध्यमातून खरबूज विक्री

ती विक्रीसदेखील आलेली आहेत. मात्र, लॉकडाउन सुरू असल्याने गावासह परिसरातील आठवडे बाजार बंद झाले. तसेच शहरात संचाबंदी सुरू असल्याने जाता येईनासे झाले. बाहेर जिल्‍ह्यातदेखील सीमाबंदीमुळे जाणे अशक्‍य झाले आहे. सध्या खरबुजाचे पीक विक्रीस आले आहे. त्याची विक्री केली नसल्याने ते जागेवरच खराब होऊन जातील, यासाठी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून खरबूज विक्री करण्याचा निर्णय घेतला. 

४० हजारांचे खरबूज विकले

तशी ग्रुपद्वारे नागरिकांना माहिती दिली. शिवाय एक मोबाइल कॉलवर घरपोच खरबूज उपलब्ध करून देण्याचा फंडा वापरला. यातून त्यांनी लॉकडाउनमध्ये ४० हजारांचे खरबूज विकले. त्‍यांना खर्च वजा जाता ३० हजारांचे उत्‍पन्न मिळाले आहे. योग्य नियोजन केल्यास अडचणींवर मात करता येते हे त्यांनी खरबूज विक्रीतून दाखवून दिले आहे.

खर्च वजा जाता तीस हजारांचे उत्पन्न

फेब्रुवारी महिन्यात खरबुजाची लागवड केली. योग्य नियोजनामुळे चांगले फळे लागली. यासाठी आतापर्यंत दहा हजारांचा खर्च झाला. लॉकडाउनमुळे विक्री कशी करावी असा प्रश्न पडला होता. मात्र, मोबाइलचा उपयोग करत व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून विक्री केली. खर्च वजा जाता तीस हजार रुपये मिळाले आहेत.
-बाळू मेहत्रे, खरबूज उत्‍पादक

९३ हजार ९३९ कर्जखाती अपलोड

हिंगोली : जिल्‍ह्यात आतापर्यंत ९३ हजार ९३९ शेतकऱ्यांचे पीककर्ज व मध्यम मुदती कर्जाची खाती बँकेने सरकारकडे पाठविली असून यापैकी पात्र शेतकऱ्यांना ३९० कोटी २३ लाख रुपयांची रक्‍कम वितरीत केल्याची माहिती जिल्‍हा उपनिबंधक सुधीर मैत्रेवार यांनी दिली.

६१ हजार खात्यांचे आधार प्रमाणीकरण

जिल्‍ह्यात आतापर्यंत पीककर्ज व मध्यम मुदती कर्जाची ९३ हजार ९३९ शेतकऱ्यांची कर्जखाती पात्र झाली आहेत. बँक प्रशासनाने ही खाती सरकारकडे मंजुरीसाठी पाठविली आहेत. यातील विशिष्ट क्रमांकासह ७२ हजार ३०५ खाती मंजूर झाली आहेत. तसेच ६१ हजार ४४३ खात्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. 

५०८ खाती प्रलंबित

आधार प्रमाणीकरण शिल्‍लक असलेली दहा हजार ८०६ खाती आहेत. तसेच एक हजार २११ खातेधारकांनी तक्रारी केल्या होत्या. यातील ८६ खात्यांचे डीएलसीद्वारे निवारण करण्यात आले आहे. आता डीएलसीकडे ५०८ खाती प्रलंबित आहेत.

५८ हजार शेतकऱ्यांना लाभ 

तसेच तहसीलद्वारे तक्रार निवारण झालेली ३७७ खाती असून २४० खाती प्रलंबित आहेत. आतापर्यंत ५८ हजार ८४६ शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून पात्र शेतकऱ्यांना ३९० कोटी २३ लाख रुपयांची रक्‍कम वितरीत केल्याची माहिती श्री. मैत्रेवार यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com