जळगाव घरकुल घोटाळ्यावर गुरुवारी सुनावणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद : जळगाव घरकुल घोटाळ्यातील आरोपींच्या जामीन अर्जांवर आता गुरुवारी (ता. तीन) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होणार आहे. 

औरंगाबाद : जळगाव घरकुल घोटाळ्यातील आरोपींच्या जामीन अर्जांवर आता गुरुवारी (ता. तीन) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होणार आहे. 
धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपींना ठोठावलेली शिक्षा आणि दंडामध्ये वाढ करण्यासंदर्भातील शासनाचे अपील; तसेच सत्र न्यायालयाच्या आदेशाविरुद्धचे आरोपींचे अपील औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे आणि न्यायमूर्ती के. के. सोनवणे यांनी 19 सप्टेंबरला दाखल (ऍडमिट) करून घेतले होते; तसेच आरोपींच्या जामीन अर्जांच्या अनुषंगाने खंडपीठाने प्रतिवाद्यांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला होता. जामीन अर्जांवर एक ऑक्‍टोबरला सुनावणी होणार होती; मात्र सुनावणी तीन ऑक्‍टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Homicidal Scam Case