प्रशंसनीय कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत कृष्णकांत उपाध्याय, आर. रागसुधा,
प्रशंसनीय कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत कृष्णकांत उपाध्याय, आर. रागसुधा,

प्रशंसनीय कामगिरी करणाऱ्या पोलिसांचा गौरव

परभणी : पोलिस दलात उल्लेखनीय व प्रशंसनीय कामगिरी करणाऱ्या जिल्हा पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रजासत्ताकदिनी गौरव करण्यात आला. पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते या अधिकारी कर्मचाऱ्यांना गौरवपत्र वितरित करण्यात आले.

२०१९ वर्षात परभणी जिल्हा पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांगली कामगिरी केली आहे. गुन्हे उघडकीस आणण्याबरोबरच प्रशासकीय कामकाजातही अधिकारी - कर्मचाऱ्यांचा वरचष्मा राहिला आहे. उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताकदिनी (ता. २६) पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते गौरवपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यात स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक व्ही. एस. आलेवार, पोलिस ठाणे जिंतूर येथील पोलिस कर्मचारी गजानन राठोड व शंकर हाके यांना गौरविण्यात आले.

यांचा करण्यात आला गौरव
त्यानंतर पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या हस्ते सहायक पोलिस निरीक्षक अजयकुमार पांडे (पोलिस ठाणे, सेलू), शिवदास निवृत्ती लहाने (पोलिस ठाणे, ताडकळस), संतोष श्यामराव सानप (पोलिस ठाणे, नानलपेठ), फौजदार किशोर नायक (स्थानिक गुन्हे शाखा), व्ही. आर. कुसमे (पोलिस ठाणे, कोतवाली), पोलिस नायक अरुण विठ्ठलराव पांचाळ (स्थानिक गुन्हे शाखा), पोलिस हवालदार राजेश रावणराव जाधव (वाचक शाखा), जावेद खान मकबुलखान (शहर वाहतूक शाखा), पोलिस नायक अजहर पटेल (दहशतवाद विरोध पथक), पोलिस हवालदार याहिया गुलाम सिद्धिकी (नियंत्रण कक्ष), सुनील रामराव गरुड (जिल्हा विशेष शाखा), पोलिस नायक सुरेश वानखेडे (वाचक शाखा), पोलिस हवालदार शिवाजी दशरथ भांगे (कोर्ट पैरवी), पोलिस शिपाई राम ज्ञानोबा घुले (सायबर सेल), पोलिस नायक योगेश वैजनाथराव चरकपल्ली (पोलिस मुख्यालय), पोलिस हवालदार भारत तावरे (पोलिस ठाणे ताडकळस), चालक पोलिस नायक महारुद्र शिवाजीराव सपकाळ (बीडीडीएस), पोलिस हवालदार लखनसिंह गणेशसिंह ठाकूर (श्वानपथक), पोलिस शिपाई नामदेव डुब्बे (पोलिस ठाणे जिंतूर), आनंदा थोरवड (पोलिस ठाणे सेलू), कनिष्ठ श्रेणी लिपिक प्रवीण नाथाराव वायाळ (पोलिस अधीक्षक कार्यालय), सफाईगार (शेख समीर शेख सलीम (पोलिस अधिक्षक कार्यालय) या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना गौरवपत्र देऊन गौरविण्यात आले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com