वृद्ध कलाकारांचे मानधन जमा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

जरंडी : वीस महिन्यांपासून मानधन रखडलेल्या वृद्ध कलावंतांना राज्य शासनाने तातडीची मदत म्हणून वृद्ध कलावंतांच्या खात्यात मानधनाची रक्कम गुरुवारी जमा केली. सोयगाव तालुक्यातील 44 वृद्ध कलावंतांना 1 कोटी 32 लाख रु निधी प्राप्त झाला आहे. जिल्हा परिषद सदस्या पुष्पा काळे यांच्या प्रयत्नातून सोयगाव तालुक्यातील वृद्ध कलावंताच्या मानधनाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे.

नाट्यपंढरी म्हणून राज्यभर ओळख असलेल्या सोयगाव तालुक्यातील कलेवर उपजीविका भागविणाऱ्या 44 वृद्ध कलावंतांना गेल्या वीस महिन्यापासून कलावंतांचे मानधन मिळत नव्हते. दरम्यान जिल्हा परिषद सदस्या पुष्पा काळे यांनी महिनाभरापासून पाठपुरावा करून या वृद्ध कलावंतांना मानधन मिळण्याचा मार्ग मोकळा करून दिल्याने गुरुवारी वृद्ध कलावंतांच्या खात्यावर प्रत्येकी 30 हजार याप्रमाणे निधी वर्ग करण्यात आला आहे. सोयगाव तालुक्याला 1 कोटी ३२ लाख रु निधी प्राप्त झाल्याने ऐण संकटाच्या काळात वृद्धांना आधार मिळाला आहे.

तालुक्यात कलेवर उपजीविका करून कलेचा छंद जोपासणाऱ्या या वृद्धांना वीस महिन्यापासून दमडीही दिली नव्हती. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात नाट्य पंढरी म्हणून ओळख असलेल्या सोयगावच्या कलावंतांच्या मानधनाचा प्रश्न जिल्हा परिषद सदस्य पुष्पा काळे यांच्या मध्यस्थीने उपस्थित करण्यात आल्याने तातडीने यावर तोडगा काढण्यात येवून तालुक्यातील मानधनापासून वंचितांना मानधन मिळाले आहे. सोमवार पासून वृद्ध कलावंतांनी बँकेत जावून मानधनची रक्कम काढावी असे आवाहनही करण्यात आले आहे. 

Web Title: Honorarium deposit of old artists accounts