Hospital Employee return to the cancer hospital in Aurangabad
Hospital Employee return to the cancer hospital in Aurangabad

घाटीसह कर्करोग रुग्णालयात कंत्राटी कर्मचारी परतले कामावर 

औरंगाबाद : घाटीसह शासकीय कर्करोग रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (ता. 22) सकाळपासून काम बंदचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे दोन्ही रुग्णालयांमध्ये स्वच्छता व रुग्णसेवेचे काम विस्कळित झाले होते. शुक्रवारी (ता. 23) कामगारांच्या प्रश्नासंबंधी अभ्यागत समितीचे अध्यक्ष तथा आमदार अतुल सावे यांनी बैठक घेऊन यातून तोडगा काढला. त्यामुळे कामगार कामावर परतल्याने दोन्ही रुग्णालयांच्या स्वच्छता व रुग्णसेवा पूर्वपदावर यायला सुरवात झाली. 

कंत्राटात 13 हजार रुपये वेतन देय असताना कंत्राटदार किमान वेतन कायद्याची पायमल्ली करीत कर्मचाऱ्यांना केवळ पाच ते सात हजार रुपये असे तुटपुंजे वेतन देत असल्याचे कंत्राटदारांचे म्हणणे होते. साफसफाईच्या कामात अडचण होऊ नये म्हणून केलेले "आऊटसोर्सिंग' केले. परंतु हा उपाय रुग्णालय प्रशासनाची डोकेदुखी ठरत असल्याचे समोर आले. ठाणे येथील एक्‍झिमियम मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने कर्करोग रुग्णालयात 50 तर घाटीत 46 कर्मचारी जुन महिन्यांपासून नेमले. कंत्राटदार महिन्याच्या सुट्या, बोनस देत नाही. शिवाय कपडे व साफसाफईच्या सामानाचेही पैसे कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करीत आहे. यातून कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण होत असल्याची बाब कामगार शक्ती संघटनेचे गौतम खरात व उल्हास पाटील यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.

कर्करोग रुग्णालयात झालेल्या बैठकीत प्रभारी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, विषेश कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रकाश देहाडे, कंत्राटदाराचे प्रतिनीधी हरिष हरकुंडे, नितेश पारकर यांची उपस्थिती होती.

आमदार सावे यांनी कंत्राटदाराच्या प्रतिनिधीवर प्रश्नांची सरबत्ती करुन कामगारांचे प्रश्न सोडवण्याचे ठणकावले. कामगारांच्या मागण्या व त्या पूर्ततेसाठी कंत्राटदाराकडून अंडरटेकिंग लिहून घेण्यात आले. त्यानंतर कामगार कामावर परतल्याचे डॉ. अरविंद गायवकवाड यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com