वसतिगृहातील विद्यार्थिनींना भोजनातून विषबाधा

Food-Testing-Laboratory
Food-Testing-Laboratory
देवणी (जि. लातूर) - येथील सामाजिक न्याय विभाग संचालित मुलींच्या शासकीय वसतिगृहातील 21 विद्यार्थिनींना रविवारी (ता. सात) रात्री भोजनातून विषबाधा झाल्याचा प्रकार उघड झाला. या सर्व विद्यार्थिनींवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. रात्री भोजन घेतल्यानंतर पाच विद्यार्थिनींना अचानक मळमळ व उलट्या सुरू झाल्या. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर आणखी विद्यार्थिनींना त्रास सुरू झाला. त्यांनी रात्री एक वाजता उपचारासाठी दाखल करण्यात आले. विद्यार्थिनींना व्हायरल फिवर, तसेच गॅस्ट्राइटीसची बाधा असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुराधा बिरादार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com