उन्हाच्या चटक्‍याने लाहीलाही 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मार्च 2017

औरंगाबाद - तापमानातील वाढ कायम असून सोमवारी (ता. 27) शहरात 40.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मार्च महिन्यातच सूर्य आग ओकत आहे. 2004 मध्ये मार्च महिन्यात तापमानाची 40.6 अंश एवढी नोंद झाली होती. त्यानंतर तब्बल तेरा वर्षांनतर यंदा मार्च महिन्यात तापमान चाळीस अंशांच्या पुढे गेले आहे. 

आठवडाभरापासून तापमानात सातत्याने वाढ झाल्याने उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. दुपारच्या वेळेस उन्हाचा चटका जास्त असल्याने रस्त्यावर आणि बाजारपेठेतही शुकशुकाट दिसून येतो. अनेक जण सायंकाळच्या वेळेस खरेदीसाठी बाहेर पडताना दिसतात. मार्च महिन्यातच तापमानाने उच्चांक गाठला आहे. 2004 पासून शहरात तापमान चाळिशीच्या पुढे गेले नव्हते. हे तापमान 37 ते 39 अंशाच्या दरम्यान राहत होते. यंदा मात्र तापमान मार्च महिन्यातच 40.5 अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे. 

मार्च महिन्यातील सर्वाधिक तापमान (कंसात तारीख) 
सन.......................तापमान 
2007.................39.6 (30) 
2008..................38.0 (18,19) 
2009..................39.4 (31) 
2010...................39.4 (22,23) 
2011...................38.2 (18) 
2012...................39.5 (26) 
2013...................37.8 (28) 
2014...................38.2 (31) 
2015....................38.4 (25,26,27) 
2016....................39.6 (26,27) 

Web Title: hot temperature in aurangabad