हॉटेलमालक दाम्पत्यावर रोखले पिस्तूल; दोघे जेरबंद 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

बीड - हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर मालकाने बिलाची मागणी करताच दोघांनी त्यांच्या कानशिलावर पिस्तूल रोखून ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी त्यांनी हॉटेल मालकाच्या पत्नीलाही धमकावले. ही घटना बुधवारी (ता. 22) रात्री शहरातील मित्रनगर भागातील एका हॉटेलमध्ये घडली. या प्रकरणी माजी नगरसेवक अशोक शिराळेसह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना जेरबंद केले आहे. 

येथील किरण उत्तमराव उबाळे यांचे मित्रनगर भागात हॉटेल आहे. रात्री साडेआठ वाजता माजी नगरसेवक अशोक शिराळे, अमोल शिराळे, सतीश क्षीरसागर, रत्नदीप गोरे, अक्षय आठवले हे तेथे आले. त्यातील काहींनी चहा तर काहींनी थंडपेय घेतले. सिगारेट व अंडी खरेदी करून ते पैसे न देताच बाहेर पडू लागले. यावेळी हॉटेल मालक उबाळे यांनी त्यांच्याकडे बिलाच्या पैशांची मागणी केली. तेव्हा या सर्वांनी "तुझे कशाचे पैसे' असे म्हणत थेट शिवीगाळ सुरू केली. रत्नदीप गोरे याने किरण उबाळे यांच्या अंगाला मिठी मारून लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली तर अशोक शिराळे याने तोंडावर बुक्की मारून डोक्‍याला पिस्तूल लावत ठार मारण्याची धमकी दिली. त्याच वेळी अक्षय आठवले याने उबाळे यांच्या पत्नी छाया यांच्यासमोर जाऊन पिस्तूल दाखवत धमकावले. त्यानंतर दोघांनी हॉटेलच्या गल्ल्यातील चार हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले, असे उबाळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात किरण उबाळे यांच्या फिर्यादीवरून पाचजणांविरुद्ध शिवाजीनगर ठाण्यात दरोडा व आर्म ऍक्‍टअन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक सलीम पठाण हे तपास करत आहेत. 

Web Title: Hotel owner pistols stopped on couple