
नांदेड : सांस्कृतिक मेजवानी ठरणारा होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सव यंदा शुक्रवार (ता. १७) ते रविवार (ता. १९) अशा तीन दिवसांत आयोजित केला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते, तर समारोप रविवारी राज्याचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. काय आहे होट्टलचे महत्व या बाबत माहिती असायला हवी.
एक हजार वर्षापुर्वीचे शिलालेख
नांदेड : सांस्कृतिक मेजवानी ठरणारा होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सव यंदा शुक्रवार (ता. १७) ते रविवार (ता. १९) अशा तीन दिवसांत आयोजित केला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते, तर समारोप रविवारी राज्याचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. काय आहे होट्टलचे महत्व या बाबत माहिती असायला हवी.
एक हजार वर्षापुर्वीचे शिलालेख
होट्टल येथे प्रत्यक्ष ऐतिहासिक पुरावा म्हणून एक हजार वर्षापूर्वीचे संस्कृत, मराठी, कानडी लिपितील चार शिलालेख आहेत. या शिलालेखाने वाचन करण्यात आले आहे. शारदाभुवन शिक्षण संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘इन्सिक्रीप्शन ऑफ नांदेड डिस्ट्रिक्ट’ या ग्रंथात त्यांचा समावेश आहे.
चार प्राचीन वास्तूच्या शिवाय मुर्ती आविष्काराचा अप्रतिम संग्रह येथे पहायला मिळतो. या मुर्ती आविष्कारात अप्रतिम नृत्य आविष्कार दर्शविणाऱ्या नर्तकीच्या मनमोहक मुर्ती, प्राचीन काळात वापरलेल्या वाद्यांचा अप्रतिम आविष्कार येथे दिसतो. मृदंग, वीणा व इतर वाद्ये लक्षणीय आहेत.
हेही वाचा.....नवरा-बायकोच्या भांडणात गावाचा जीव धोक्यात
शिल्पाविष्काराचा अप्रतिम नमुना
मुर्तीच्या रेखाटनातील तालबध्दता, आकार, गतीशिलता, कमनियता उल्लेखनिय आहे. वेषभूषा, केशभूषा, अलंकार मन वेधून घेतात. हा शिल्पाविष्कार मंदिरांच्या अंगोपांगावर घडलेला असला तरी त्यात धर्मश्रध्देबरोबरच धर्मापेक्षा जास्त कला आविष्कारांचा भाग अधिक लक्षणिय आहे. प्राचिन वारसा जोपासण्यासाठी होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सव रसिकासांठी पर्वणी आहे.
एक हजार वर्षापुर्वीच्या मंदिराच्या बाह्य भिंतीवरील व गर्भगृहातील हा कला अविष्कार पाहण्यासाठी, कला आस्वाद घेण्यासाठी ही लोकपरंपरा जोपासण्याची आणि समृध्द वारसा म्हणून त्याचे रक्षण करण्यासाठी भावना लोक माणसात निर्माण करण्याची गरज आहे. त्यातून निर्माण होणाऱ्या पर्यटनातून स्थानिकांना रोजगाराची संधी निर्माण व्हावी म्हणून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
हेही वाचलच पाहिजे.....नांदेडला मानव विकासकडून ४५ लाख
चालुक्य राजाची उपराजधानी होट्टल
नांदेड जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेले व चालुक्यांची उपराजधानी म्हणून पुरातन काळात नावारूपाला आलेले ग्राम म्हणून होट्टलची ख्याती आहे. होट्टल येथे सिध्देश्वराचे प्राचीन चालुक्य मंदीर स्थित असून सभोवती अनेक प्राचिन मंदिरे आहेत.
प्राचिन शिल्प स्थापत्य कलेचा समृध्द वारसा जतन, संवर्धन करणे पर्यटन वाढीच्या दृष्टीने आवश्यक आहे. त्याअनुषंगाने जनजागृती करणे पर्यटकांना तसेच महाराष्ट्रातील लोकांना या ऐतिहासिक व प्रेक्षणिय स्थळांची माहिती देणे या दृष्टीने पर्यटन महोत्सव आयोजित करण्याचे ठरले आहे.
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची संकल्पना
जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्या संकल्पनेतून होट्टल सांस्कृतीक व पर्यटन महोत्सवास मुर्त स्वरूप देण्यासाठी जिल्ह्यातील आमदारांनी स्थानिक विकासनिधी दिला आहे आहे. शासनाने या प्रस्तावास खास बाब म्हणून मान्यता प्रदान केली आहे.
या महोत्सवाचे आयोजित करण्यासाठी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. त्यात सरपंच शेषराव सूर्यवंशी, लेखा अधिकारी नीलकंठ पाचंगे, कार्यकारी अभियंता सुधीर नाईक, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी काम पाहत आहेत. या महोत्सवात राज्यातील विविध कलावंत तसेच इतिहास तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.
कला, भक्ती व संस्कृतीचा संगम हा होट्टल महोत्सव आहे. यात सर्वांनी सहभागी व्हावे, सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा. चालुक्यन शिल्पकला पहावी व आपली संस्कृती संवर्धित करावी.
अरुण डोंगरे, जिल्हाधिकारी, नांदेड.