सिल्लोडला भरदिवसा घरफोडी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

शहरातील मध्यवस्तीत भरदिवसा घरफोडी करून चोरट्यांनी दागिन्यांसह रोख रक्‍कम लंपास केल्याची घटना शुक्रवारी (ता. सहा) दुपारी घडली.

सिल्लोड (जि.औरंगाबाद) : शहरातील मध्यवस्तीत भरदिवसा घरफोडी करून चोरट्यांनी दागिन्यांसह रोख रक्‍कम लंपास केल्याची घटना शुक्रवारी (ता. सहा) दुपारी घडली.

शहरातील शिवाजीनगर परिसरातील रहिवासी दिलीप दौलत पारवे हे महालक्ष्मी सणाच्या निमित्ताने अन्वी (ता. सिल्लोड) येथे गावी दुपारी बारा वाजेच्या सुमारास गेले होते. घराला कुलूप असल्याचे पाहून चोरट्यांनी घरामागील जिन्याचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. कपाट फोडून त्यात ठेवलेले अंदाजे पाच तोळे सोने व रोख तीस हजार रुपये असा एकूण अंदाजे दोन लाख रुपयांच्या मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: House Broken In Sillod