घाटीत कचऱ्याला भीषण आग

योगेश पायघन 
रविवार, 16 डिसेंबर 2018

औरंगाबाद : घाटी रुग्णालयाच्या शवागारामागच्या बाजूस साचलेल्या कचऱ्याला सायंकाळी सहाच्या सुमारास आग लागली. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची एकच धावपळ उडाली. रुग्णवाहिकांचे चालक, कर्मचारी आणि अग्निशमन विभागाच्या मदतीने आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 

शवविच्छेदनगृहाच्या मागील बाजूस कचरा जमा करण्यासाठी असलेल्या मोकळ्या जागेवर कचरा पडून होता. शिवाय शवागृहाला लागून असलेल्या मागच्या एका खोलीतही कचरा साचलेला होता. त्या कचऱ्याला आग लागल्याने धुराचे लोळ उठत होते. शेचारीच रेकॉर्ड रुम व डायलेसिस विभाग असल्याने समोर एमआरआय, सीव्हीटीएस विभागातील नातेवाईकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. तर शवविच्छेदन विभागाने वेळीच अग्निशमन विभागाला कळविल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु असून, आगीमुळे घाटी परिसरात सध्या धुरच धुर दिसत आहेत.

Web Title: Huge Fire in Ghati

टॅग्स