लग्नाचं जेवण बाधलं! परभणीत 100 जणांना विषबाधा
परभणी : दर्गा रोड येथे लग्नाच्या जेवणातून १०० हून अधिक लोकांना विषबाधा झाल्याची घटना रविवारी (ता.१५) रात्री घडली. सर्व बाधित लोकांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात बाधित लोकांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परभणीतील दर्गा रोड परिसरात असलेल्या मेहबूब फंक्शन हॉल येथे एक विवाह समारंभ पार पडला. या सोहळ्यात जेवण झाल्यानंतर काही वेळाने सुमारे दीडशे लोकांना पोटदुखी, उलटी आणि मळमळ होणे असा त्रास जाणवू लागला.
वेळीच सावधगिरी बाळगत या सर्वांना परभणीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.