पती-पत्नीचा दगडाने ठेचून निर्घृण खून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

चापानेर - हसनखेडा (ता. कन्नड) शिवारातील दळवी वस्तीवर पती-पत्नीचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून करण्यात आला. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. गावातील एक महिला शेतात कामासाठी जात असताना पती-पत्नी घरासमोरील अंगणात खाटेवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले निदर्शनास आले. कारभारी रामचंद्र शिनगारे (वय 65), यमुनाबाई कारभारी शिनगारे (वय 60) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत.

मारेकऱ्याने शांत डोक्‍याने हे कृत्य केल्याचे दिसून येत आहे. वीजपुरवठा खंडित करून, दगडाच्या साह्याने डोके ठेचून पती-पत्नीचा खून करण्यात आला. तो दगड शेजारीच पाण्याच्या हौदात टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. तपासाला वेगळी दिशा देण्यासाठी घरातील कपाटातील वस्तू खाली फेकल्या. कपडे अस्ताव्यस्त करण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: husband and wife murder crime

टॅग्स