पोटगी न देणाऱ्या पतीस अटक 

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 24 जानेवारी 2019

नांदेड : पत्नीला पोटगी न देता न्यायालयीन आदेशाची पायमल्ली करणाऱ्या पतीस मुखेड पोलिसांनी अटक केली. तीन लाख 45 हजार रुपये पोटगी देण्यास कसुर केल्याने पतीला कोठडीची हवा खावी लागली.  

नांदेड : पत्नीला पोटगी न देता न्यायालयीन आदेशाची पायमल्ली करणाऱ्या पतीस मुखेड पोलिसांनी अटक केली. तीन लाख 45 हजार रुपये पोटगी देण्यास कसुर केल्याने पतीला कोठडीची हवा खावी लागली.  

मुखेड तालुक्यातील चांडोळा येथे राहणारा चंदर यमाजी राठोड (वय 50) याचा न्यायालयाकडून झालेला घटस्फोट व त्यापोटी पत्नीला पोटगी देण्याचा आदेश दिला होता. परंतु हा आदेश धुडकावत चंदर राठोड याने मागील अनेक दिवसापासून पोटगी दिली नाही. जवळपास 3 लाख 45 हजार रुपये पोटगी थकल्याने पिडीत पत्नीवर उपासमारीची वेळ आली होती. यावेळी न्यायालयाने पतीविरूध्द आजामीनपात्र पकड वाॅरन्ट मुखेड पोलिसांना जारी केले. यावरून फौजदार सुभाष राठोड यांनी आपले सहकारी बाबु मुंडे, रामराव चव्हाण, गोविंद चेंभुर्णे यांच्या मदतीने बुधवारी (ता. 23) रात्री चांडोळा येथून चंदर राठोड याला अटक केली.

तसेच मागील सात वर्षापासून फरार असलेला सराईत गुन्हेगार श्रीधर किशनराव कराळे (वय 35, रा. दबडे शिरूर) यालाही अटक केली. या दोघांना पीआय राठोड यांनी रात्रीच मुखेड लॉकअपमध्ये टाकले आहे.

Web Title: a husband arrested who doesn't give alimony