पत्नीचा खून करणाऱ्या पतीस जन्मठेप 

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 16 मे 2018

नांदेड : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा निर्घृण खून करणाऱ्या पतीस येथील जिल्हा न्यायाधिश एस. आर. जगताप यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 

नांदेड : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा निर्घृण खून करणाऱ्या पतीस येथील जिल्हा न्यायाधिश एस. आर. जगताप यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 

हदगाव तालुक्यातील बेलगव्हाण येथे राहणाऱ्या लक्ष्मीबाई उद्धव नवसागरे  (वय 40) यांच्या चारित्र्यावर पती उद्धव नवसागरे हा नेहमी संशय घेत होता. तसेच मुलगी कविता हिच्या लग्नासाठी माहेराहून पैसे आणण्याचा तगादा लावत होता. हे दोघे पती- पत्नी 17 जून 2015 रोजी शेतावर कामासाठी गेले. त्याच दिवशी त्याने पत्नीच्या डोक्यात टिकास मारून तिला गंभीर जखमी केले. नांदेडच्या शासकिय रूग्णालयात उपचार सुरू असतांना 23 जून 2015 रोजी मरण पावली. हदगाव पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल होता. या प्रकरणी न्यायाधिश जगताप यांनी त्याला जन्मठेप व रोख पाच हजार दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाची बाजू डी. जी. शिंदे यांनी मांडली. आरोपी शिंदे हा घटना घडली तेंव्हापासून जिल्हा कारागृहातच कच्ची शिक्षा भोगत होता.

Web Title: husband arrested who killed her wife