डोक्यात फावडे घालून पत्नीची हत्या ; पतीस जन्मठेप

डोक्यात फावडे घालून पत्नीची हत्या ; पतीस जन्मठेप

परभणी : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा निर्घृणपणे खून करणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी फलके यांनी ही शिक्षा शुक्रवारी (ता.28) सुनावली.

परभणी शहरातील साकला प्लॉट भागातील राजू पवार याने 6 जून  2017 रोजी त्याची पत्नी लता पवार यांच्यावर चारित्र्यावर संशय घेऊन तू आज कुठे व कोणासोबत गेली होती. तुला जीवे मारतो असे म्हणत तिच्या डोक्यात फावडे मारले. त्यात लता पवार ही जागीच मरण पावली होती. गुन्हा केल्यानंतर आरोपी राजू पवार हा घटनास्थळावरून पळून गेला होता. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करून आरोपी राजू पवार याच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.

याप्रकरणी तपास अधिकारी अंमलदार एम.के. ठाकूर यांनी घटनेचा तपास करून दोषारोपत्र न्यायालयात दाखल केले होते. सरकारी पक्षातर्फे एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीची आठ वर्षाची मुलगी होती. तिने घटना जशीच्या तशी न्यायालयासमोर सांगितली. ही साक्ष ग्राह्य धरल्यानंतर तसेच वैद्यकीय पुरावादेखील महत्वपूर्ण ठरला आहे.

प्रमुखजिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी फलके यांनी याप्रकरणी शुक्रवारी (ता.28) निकाल दिला. आरोपी राजू पवार यास जन्मठेपेची शिक्षा व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील मिलिंद गाजरे यांनी काम पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com