त्याने तिच्यावर केले सापासपा वार, नंतर कापून घेतला स्वतःचा गळा

Husband commits suicide by hitting his wife
Husband commits suicide by hitting his wife

वाळूज (जि. औरंगाबाद) - पत्नीवर चाकूने सपासप वार करून स्वतःचा गळा कापून घेत पतीने आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना गुरुवारी (ता. 12) दुपारी साडेबाराच्या सुमारास येसगाव (ता. गंगापूर) येथे घडली. याप्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या पत्नीवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

येसगाव येथील दत्ता किसनराव चौधरी (वय 32) हा पत्नी गंगाबाई, दोन मुली व एका मुलासह राहत होता. तो एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी होता. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीपासून तो मानसिक तणावाखाली होता. गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास दत्ता व पत्नी गंगाबाई दोघे घरात असताना दत्ताने दारूच्या नशेत दरवाजा आतून
बंद करून घेतला. दोघांमध्ये भांडण होऊन दत्ताने पत्नी गंगाबाई हिच्या पाठीवर चाकूने वार करून जखमी केले. या हल्ल्यामुळे ती बेशुद्ध होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडली.

पत्नीला बेशुद्ध अवस्थेत पाहून दत्ताने स्वतःच्या गळ्यावर वार करून आत्महत्या केली. यानंतर बेशुद्ध पडलेल्या गंगाबाई काही वेळाने शुद्धीवर आल्याने तिने पाहिले की, पती दत्ता हा रक्ताने माखला होता. त्यामुळे भयभीत झालेल्या गंगाबाईने दरवाजा उघडून आरडाओरड केली. ग्रामस्थांनी घटनास्थळावर गर्दी केली. भोलेनाथ तुळीराम गायकवाड यांनी दोघा पती-पत्नीस घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्‍टरांनी दत्ताला मृत घोषित केले. गंगाबाईवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


घटनेची माहिती मिळताच वाळूज ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे, पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे करीत आहेत. 

दुचाकीच्या धडकेत कामगार जखमी 
औरंगाबाद -
रॉंगसाईड आलेल्या दुचाकीस्वाराने कामगाराला धडक देऊन जखमी केले. हा अपघात सोमवारी (ता.नऊ) रात्री अकराच्या सुमारास सेव्हन हिलसमोरील रस्त्यावर झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्वर खान सरवर खान (38, रा. इंदिरानगर) हे सेव्हन हिल रस्त्यावरून पायी जात होते. त्यांना दुचाकीस्वाराने (एमएच-23, एएम-1100) धडक
दिली. या अपघातात ते जखमी झाले. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

ट्रक-दुचाकी अपघातात एक जखमी 
औरंगाबाद -
ट्रकचालकाने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून आलेला दुचाकीस्वार ट्रकवर आदळून जखमी झाला. हा अपघात गुरुवारी (ता. पाच) रात्री साडेअकराच्या सुमारास गोलवाडी फाटा येथील टोलनाक्‍याजवळ झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश साहेबराव तेलखडे (58, रा. मयूरपार्क) हे दुचाकीने (एमएच-20, बीएक्‍स-285) वाळूजच्या दिशेने जात
होते. यावेळी समोरून जात असलेल्या ट्रकच्या (एमएच-43, ई-2837) चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने तेलखडे हे दुचाकीसह आदळले. यात दुचाकीचे नुकसान होऊन ते जखमी झाले. छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com