पत्नीने केलेली मारहाण सहन न झाल्याने पतीची आत्महत्या 

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 7 जून 2018

नांदेड :  पत्नी व मेहुण्याने केलेली मारहाण सहन न झाल्याने अपमानीत पतीची पेटवून घेऊन आत्महत्या केली. ही घटना क्षीरसमुद्र ( ता. देगलूर) येथे 4 जून रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी पत्नी व मेहुण्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

देगलूर तालुक्यातील क्षीरसमुद्र येथे राहणारे नागनाथ गंगाराम मोगलेपोल (वय २७) यांचे लग्न लक्ष्मीबाई यांच्याशी झाले होते. लग्नानंतर पत्नी त्याला सतत त्रास देत असे. एवढेच नाही तर चार जून रोजी मेहुणा बालाजी शिवाजी धर्मवाड (रा. येडूर) आणि त्यांची लक्ष्मीबाई यांनी संगनमत करून नागनाथ यांना मारहाण केली.

माहेरी जाऊ नको असे म्हटल्याने मारहाण करून पतीला अपमानीत केले. हा अपमान सहन न झाल्याने नागनाथ मोगलेपोल यांनी आपल्या रहात्या घरी अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेतले. यात ते गंभीर भाजले होते. रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूपूर्व जबाबावरून व सायलु गंगाराम मोगलेपोल यांच्या फिर्यादीवरून मरखेल पोलिस ठाण्यात पत्नी व मेहुण्यावर आत्महत्येस परावृत्त केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक चंद्रकांत गुंगेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार डी. एस. येवले हे करीत आहेत. 

Web Title: husband commits suicide for insulting behavior of wife