पत्नीने सासरी येण्यास नकार दिल्याने पतीने केली आत्महत्या 

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 31 मे 2018

सासरवाडीत आपला पत्नीने घोर अपमान केल्याने तो रागाच्या भरात घरी आला. अपमान जिव्हारी लागल्याने त्याने 8 मे ला कीटकनाशक प्राशन केले.

नांदेड - माहेरी गेेलेली पत्नी सासरी आपल्या सोबत आली नसल्याने रागाच्या भरात पतीने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना शहरापासून जवळच असलेल्या बाभूळगाव येथे घडली. 

नांदेड तालुक्यातील बाभूळगाव येथे राहणारा सुभाष खंडू कांबळे (वय २३) हा माहेरी गेलेल्या आपल्या पत्नीला आणण्यासाठी गेला होता. परंतु पत्नीने सासरी येण्यास नकार दिला. सासरवाडीत आपला पत्नीने घोर अपमान केल्याने तो रागाच्या भरात घरी आला. अपमान जिव्हारी लागल्याने त्याने 8 मे ला कीटकनाशक प्राशन केले. नातेवाईकांनी त्याला शासकिय रूग्णालय विष्णुपूरी येथे दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असतांना मंगळवारी (ता. २९) रात्री साडेआठच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी प्रकाश खंडू कांबळे यांच्या माहितीवरुन नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्री. तिडके हे करीत आहेत.  
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Husband committed suicide due to wife refuses to come back home