पत्नीचा हात मोडणाऱ्या पतीला दंड 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

औरंगाबाद -  शहरातील खासगी रुग्णालयात परिचारिका असलेल्या पत्नीला रुग्णालयात शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या आणि पत्नीचा हात मोडणाऱ्या आरोपी पती बबन तुपलोंढे (रा. जामगाव, ता. गंगापूर) याला दोषी ठरवत एक वर्षाच्या चांगल्या वर्तणुकीच्या बंधपत्रावर सोडण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एच. एस. पुराडउपाध्ये यांनी दिले. 

परिचारिका व पीडित पत्नी प्रतिभा बबन तुपलोंढे (रा. जामगाव, ता. गंगापूर) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, बबन याच्याशी 20 जुलै 2014 रोजी विवाह झाल्यापासून त्याने पत्नीला महिनाभर चांगले वागवले. मात्र त्यानंतर तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा शारीरिक-मानसिक छळ करत होता. एक दिवस पत्नी रुग्णालयात काम करत असताना बबन व त्याच्या नातेवाइकांनी येऊन शिवीगाळ व मारहाण केली. यात पतीने केलेल्या मारहाणीमुळे प्रतिभा यांचा हात मोडला. प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहायक सरकारी वकील अशोक सोनवणे यांनी सात साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने आरोपीला पतीला दोषी ठरवत एक वर्ष चांगल्या वर्तणुकीच्या बंधपत्रावर सोडले व पाच हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: husband fine for Wife hand breaks