तिहेरी तलाकमुळे पतीला तुरुंगवास (वाचा सविस्तर)

Husband Custody triple divorce
Husband Custody triple divorce


औरंगाबाद : पत्नीचा मानसिक छळ करून तसेच तिच्या घरी जाऊन तीनवेळा तलाक म्हटल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पतीची रवानगी हर्सूल तुरुंगात करण्याचे (न्यायालयीन कोठडी) आदेश प्रथमवर्ग न्यायदंडधिकारी डी. एस. वमने यांनी दिले. शारुख अब्दुल रहेमान (रा. कोर्ट नांदरवाडी, ता. सिल्लोड) असे आरोपीचे नाव आहे. प्रकरणात 19 वर्षाय पीडितेने फिर्याद दिली होती.

त्यानुसार शारुख याने चार ऑगस्ट 2019 रोजी पीडितेच्या घरी जाऊन तीनवेळा तलाक असे म्हटले होते. तसेच शारुख व त्याच्या घरच्यांनी पीडितेला प्लॉटखरेदीसाठी माहेराहून सहा लाख रुपये घेऊन ये, असा तगादा लावत मारहाण केली. त्यासाठी उपाशी ठेवून मानसिक त्रासही दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पीडितेच्या तक्रारीवरुन नऊ ऑक्‍टोबर 2019 रोजी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात पती शारुखसह त्याच्या घरच्यांविरोधात कौटुंबिक छळ व मुस्लिम महिला (विवाहाच्या अधिकाराचे संरक्षण) कायदा 2019 च्या कलम चारअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. प्रकरणात आरोपीला पोलिसांनी बुधवारी (ता. सहा) अटक करुन न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीची रवानगी हर्सूल कारागृहात करण्याचे आदेश दिले. दरम्यान, आरोपीने जामीन अर्ज दाखल केला. सदर अर्जावर गुरुवारी (ता. 7) सुनावणी अपेक्षित आहे. फिर्यादीतर्फे ऍड. गोविंद शर्मा व ऍड. आकर्ष माळवदकर यांनी बाजू मांडली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com