चारित्र्यावर संशय घेऊन पतीने केला खून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 नोव्हेंबर 2018

चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा गळा आवळून निर्घृण खून करणाऱ्या पतीविरूध्द कुंटूर ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना तीन नोव्हेंबरच्या सायंकाळी सहाच्या सुमारास राहेर येथे घडली.

नांदेड : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा गळा आवळून निर्घृण खून करणाऱ्या पतीविरूध्द कुंटूर ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना तीन नोव्हेंबरच्या सायंकाळी सहाच्या सुमारास राहेर येथे घडली.

नायगाव तालुक्यातील राहेर येथे राहणारा पुंडलीक सुभाष पिल्लेवाड (वय 25) हा लग्नानंतर आपली पत्नी सपना (वय 20) हिला किरकोळ कारणावरून त्रास देत असे. एवढेच नाही तर तिच्या तो नेहमी चारित्र्यावर संशय घेत होता. यातूनच या दोघांचे वाद होत असत. अखेर पत्नीचा काटा काढण्याचे पुंडलीक पिल्लेवाड यांने ठरविले.

शनिवारी (ता. 03) सायंकाळी तो आपल्या घरी आला. यावेळी पत्नी घरी एकटीच होती. तिच्याशी त्यांने वाद घातला आणि मारहाण केली. तसेच तिला घरात ओढत नेऊन तिचा रुमालाने गळा आवळून खून केला. घटनेची माहिती तिच्या माहेरी कळविली नाही. या प्रकरणी रेखा गणपत नागरवाड यांच्या फिर्यादीवरुन कुंटूर ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. एस. मरे हे करीत आहेत.

Web Title: husband killed his Wife In Nanded