crime
crime

पत्नीचा गळा आवळून खून 

नांदेड : माळेगाव जत्रेला जाण्यासाठी पैसे दिले नसल्याने संतप्त पतीने आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केला. ही घटना लोहा शहरातील इंदिरानगर भागात मंगळवारी (ता. 8) दुपारी घडली. मारेकरी पतीला पोलिसांनी अटक केली असून 11 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे. 

लोहा शहरातील इंदिरानगर भागात राहणारा मजुर व्यंकटी तेलंग (वय 37) हा दारुच्या सवयीचा होता. तो नेहमी पैशाच्या वादावरून पत्नी अंजनाबाई (वय 32) हिच्यासोबत वाद करीत असे. वेळप्रसंगी तिला मारहाणही करीत असे. यातच माळेगाव यात्रेला व अंडगा येथील एका नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी जाण्यासाठी तो पत्नीला पैसे मागु लागला. परंतु पत्नीकडे पैसे नसल्याने ती देत नव्हती. यामुळे तो मंगळवार सकाळपासून तिच्यासोबत वाद घालत होता. त्यांची मुलगी शाळेत गेल्यानंतर त्याने आपली पत्नी अंजनाबाई हिचा गळा आवळून खून केला.

ही माहिती तिच्या माहेरी समजताच नातेवाईकांनी लोहा गाठले. नामदेव अंबाजी पालमपल्ली (रा. माखणी ता, पूर्णा, परभणी) यांच्या फिर्यादीवरुन लोहा ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला. त्याच्याविरूध्द यापूर्वीही हाणामारीचा गुन्हा दाखल होता. पोलिस फौजदार कपील आगलावे यांनी मारेकरी पतीला रात्रीच अटक केली. त्याला आज लोहा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 11 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणाचा तपास फौजदार आगलावे हे करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com